पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कुटुंबाचे कारनामे सातत्याने चर्चेत येत आहेत. आधी पूजा खेडकर हिने बोगस प्रमाणपत्र देवून थेट यूपीएससी आयोगाची फसवणूक केली. तर आता थेट तिच्या आईने नवी मुंबईत गाडीला डंपर थडकले म्हणून क्लीनरच अपहरण केल होत. नवी मुंबई पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र मनोरमा खेडकर ही नवी मुंबई पोलिसांना मिळाली नाही. घरातून फरार होत मनोरमा खेडकर पोलिसांना चकवा देवून पळून गेली. तिच्या अटकेचे अनेक प्रयत्न पोलिसांनी केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आता पोलिसांना पत्ता लागण्याआधीच तिने वडिलांसोबत कोर्टात हजेरी लावून अटकपूर्व जामीन पण मिळवला आहे.
नवी मुंबई पोलीस काय करतात ?
मनोरमा खेडकर काही दिवस गुंगारा देवून फरार होते, मात्र पोलिसांना तपास लागत नाही. पोलिसांना न माहिती होता ती कोर्टात येते आणि हजेरी लावून जामीन पण घेते. पोलिसांच्या तपासावर एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झाल आहे. पोलीस तपासासाठी गेले असता अंगावर कुत्रे सोडली. माझ्या नवऱ्याला मी घेवून येते म्हणून ती घराच्या बाहेर पडली आणि नंतर ती पोलिसांना मिळालीच नाही. तिने आता कोर्टात जामीनासाठी अर्ज केल आहे, त्यावर आता १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. नवी मुंबई पोलिसांना ती कोर्टात येणार आहे याचीच माहिती नव्हती. मनोरमा खेडकर प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलीस किती गांभीर्याने करतात हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मनोरमा खेडकर हिचे कारनामे






