Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ‘PMC’ ची कडक कारवाई; बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र

Bougs Doctors: महानगरपालिकेने नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची वैधानिक नोंदणी व शैक्षणिक पात्रता तपासण्याचे आवाहन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 09:30 PM
आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ‘PMC’ ची कडक कारवाई; बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र
Follow Us
Follow Us:

पुण्यात बोगस डॉक्टरांविरोधात पालिकेचा दणका
गेल्या १३ वर्षांत ५६ गुन्हे दाखल
वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे: पुणे महानगरपालिकेने शहरातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून २०१३ ते २०२६ या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोंढवा परिसरातील एका संशयित बोगस वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध व कारवाई समितीची २२ वी बैठक झाली. बैठकीत शहरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभाग, विधी विभाग, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बोगस डॉक्टरांचा होणार गेम! क्युआर कोड स्कॅन करताच समोर येणार कुंडली; मंत्री Hasan Mushrif यांची विधानसभेत मोठी घोषणा

बैठकीत यापूर्वी दाखल झालेल्या ५६ गुन्ह्यांच्या न्यायालयीन स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच संबंधित ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे का, याची अद्ययावत माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांमध्ये बोगस डॉक्टरांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. पालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे केम्स दारा वाडिया (केडीएम) या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची वैधानिक नोंदणी व शैक्षणिक पात्रता तपासण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती महापालिकेच्या आरोग्य विभागाला किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Crime News : बोगस डॉक्टरला खामगाव येथून ठोकल्या बेड्या; यवत पोलिसांची मोठी कारवाई

बोगस डॉक्टरांचा होणार गेम

नागरिकांना अधिकृत आणि नोंदणीकृत डॉक्टरांची ओळख पटवता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत माहिती दिली की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने  ‘नो युवर डॉक्टर’ नावाची क्यूआर (QR) कोड-आधारित प्रणाली सुरू केली आहे. या क्यूआर कोड स्कॅन करून, नागरिक संबंधित डॉक्टरची कायदेशीर नोंदणी झाली आहे की नाही, याची त्व

Web Title: Pune municipal corporation cracks down on quacks 56 cases registered in 13 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Bogus Doctor
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.