Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरूण- तरूणींना अवाहन

सोशल मिडीया वापरताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये, यासाठी तुम्हीच तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2025 | 10:45 AM
सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरूण- तरूणींना अवाहन

सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरूण- तरूणींना अवाहन

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ड्रग्ज तसेच कोणताही अवैध प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केले. सोबतच त्यांनी सोशल मिडीया वापरताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये, यासाठी तुम्हीच तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या, असा सल्लाही दिला.

हडपसर येथील मगपट्टासिटीत आयटी कंपन्या तसेच त्यात काम करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी मगरपट्टा सीटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोजकुमार पाटील, परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, की तुमच्या आजुबाजूला अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या. शहरातूनच पोलिसांनी ड्रग तस्करीचे मोठे रॅकेट मागील वर्षात उध्वस्त केले. आंतरराष्ट्रीय स्थरावर ते चालविले जात होते. यामध्ये ३ हजार ७०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. दरम्यान, आम्ही ड्रग्जफ्री सिटीनुसार काम करत आहोत. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आजु बाजुला असे ड्रग्ज किंवा काही अवैध प्रकार आढळून आल्यास आम्हाला कळवा. पोलीस आणि नागरिकांनी एकत्रित काम केल्यास अशा अवैध प्रकारांना आळा बसू शकेल. नुकत्याच येरवडा परिसरात घडलेल्या त्या तरूणीच्या खुनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी उपस्थित तरुण-तरुणींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कंपन्यांनी महिलांच्या, तरूणींच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांचे काटेकोर पालन करावे, असे सूचित केले.

पोर्शे कार अपघातानंतर एका स्टँडअप कॉमीडीअनकडून पोर्शे कारमधील आरोपी सुटल्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेताना पोर्शे अपघातात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळला ते गेली आठ महिन्यापासून कारागृहात असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. त्यांना अद्यापपर्यंत जामीन मिळाला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडे हडपसर परिसरातील वाहतुक कोंडी, शाळेभोवती असलेल्या टपर्‍या, रस्त्याने फिरणारे रोडरोमीओ अशा तक्रारी केल्या. तेव्हा पोलीस आयुक्तांनी तात्काळ यावर कारवाई करण्याचे सूचना दिल्या.

शहरातील शाळांच्या परिसरातील टपर्‍या उखडून टाका

पुणे शहरातील बहुसंख्य शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपर्‍या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याच टपर्‍यावर शाळकरी मुले येरजार्‍या मारताना तसेच सिगारेट सारखी व्यसने करतना आढळून आले आहे. याकडे नागरिकांनी प्रश्नाद्वारे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळांच्या शंभर मिटर परिसरातील अनिधिकृत टपर्‍या उखडून टाकण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी धडक आदेश देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: Pune police commissioner amitesh kumar has appealed to the youth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
1

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
3

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
4

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.