Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खूनाचा डाव उधळून लावत एका पिस्तूलधारी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर त्याला तब्बल आठ जणांनी एकाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 11:50 AM
पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्...

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खूनाचा डाव उधळून लावत एका पिस्तूलधारी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर त्याला तब्बल आठ जणांनी एकाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल, शंकर पवार यांच्या घराजवळ, सिंहगड रोड) या पिस्तूलधारी तरुणाला अटक केली आहे.

 

तसेच याप्रकरणात सुपारी देणाऱ्या सिंधू धोत्रे उर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नू झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रस्ता, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अपर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अपर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अमर आनंदराव पवार यांनी पर्वती पोलिसांत तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे (गुन्‍हे) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, सहायक उपनिरीक्षक रणजित फडतरे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, दयानंद तेलंगे पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

पेट्रोलिंग करताना खंडणी विरोधी पथकाची कारवाई

दोन दिवसांपुर्वी (दि. १७ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास खंडणी विरोधी पथक एकचे पथक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा गांजवे चौकात पोलिस हवालदार सचिन माळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दांडेकर पूल येथे गणेश रेणुसे, सुमित माने, निशांत राऊत, अमन झरेकर तसेच इतरांनी टोळी तयार करून एकाचा खून करण्याचा कट रचला आहे. त्याचाच भाग म्हणून एक पिस्तुल आणून ते बाळ्या नावाच्या सराईत गुन्हेगाराला दिले आहे. दरम्यान, बाळ्या नावाची व्यक्ती दांडेकर पूल भागात फिरत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या कमरेला पिस्तुल खोचलेले आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो सध्या दांडेकर पूल येथे राहत असून मूळचा भांबेवाडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील असल्याचे सांगितले. पिस्तुलाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत त्याने सिंधू धोत्रे उर्फ आक्का, सिन्नू झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर, सुमित माने, निशांत राऊत व बापू कांबळे यांनी एकत्र २०२५ मध्ये पिस्तुल विकत आणल्याचे समजले. हे पिस्तुल त्यांनी संतोष उर्फ भावड्या साळुंखे याचा खून करण्यासाठी विकत आणले होते. ते बाळ्याला सुमित माने याच्या मार्फत देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा : बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

…म्‍हणूनच रचला खुनाचा कट

गणेश रेणुसे व संतोष साळुंखे यांच्यात २०२४ मध्ये भांडणे झाली होती. त्या भांडणात संतोष साळुंखे याला कोयत्याने मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा बदला संतोष साळुंखे घेणार असल्याची माहिती सिंधू धोत्रे उर्फ आक्का यांच्यासह इतरांना होती. मात्र, संतोष साळुंखे याच्याकडून काही हालचाली होण्यापूर्वीच त्यांनी साळुंखेच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी ३५ हजार रुपयांत पिस्तुल विकत आणले. ते बाळ्याच्या ताब्यात देण्यात आले. या सुपारीचे पैसे त्याला काम झाल्यानंतर देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी कारवाई करून आरोपी टोळीचा डाव हाणून पाडला.

Web Title: Pune police has arrested a criminal in the dandekar bridge area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
1

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
2

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
4

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.