
प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या
फरार होण्याच्या तयारीत होता आरोपी
पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे याची माहिती मिळताच आरोपी जरा घाबरला. यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे उरलेले तुकडेही फेकण्यास सुरुवात केली. तथापि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. आरोपीला रंगेहात पकडताच त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण आरोपी मात्र फरार होण्याच्या तयारीत होता. त्याने पोलिसांचे न ऐकता तिथून पळ काढण्यास सुरुवात केली ज्यानंतर त्याला थांबवण्यासाठी पोलिसांनी घेरतच आरोपीवर गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीच्या पायांना जखम झाली ज्यामुळे पळून जाण्यास तो यशस्वी झाला नाही. फयिरिंगनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याची चाैकशी सुरु केली.
जाैनपूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता
पोलिसांनी आरोपीकडून एक कुऱ्हाड, गर्लफ्रेंडचा पाय आणि इतर काही सामान जप्त केले आहेत. गोळीबारात घायाळ झालेल्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना जौनपूरच्या मडियाहून पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे. आरोपीची ओळख गुजरातच्या भावनगरमधील रहिवाशी हेमल खखरिया उर्फ दिलीप (42) यांचा मुलगा भूपेंद्र भाई खखरिया अशी पटली आहे.
संशयावरुन केली गर्लफ्रेंडची हत्या
मृत गर्लफ्रेंड ही उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील बाबतपुर येथील रहिवाशी असून रेशमा खातून उर्फ सना अशी तिची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी रात्री दिलीप सनाला आपल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. सना दुसऱ्या मुलासोबत बोलत असते या संशयावरुन त्या दोघांमध्ये मोठ भांडण झालं. रात्री व्हॉट्सॲप चॅटवरून हा वाद विकोपाला गेला आणि रागातच आरोपीने चाकूने गळा चिरत गर्लफ्रेंडचा खून केला. यानंतर आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.