Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातून येऊन घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख २७ रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2025 | 03:17 PM
घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : परराज्यातून येऊन घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख २७ रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सराइताकडून आंबेगाव, बावधन आणि लोणीकंद या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. व्यंकटेश रमेश (वय २२ वर्षे, रा. पी.जी. बिल्डिंग, एमआयटी कॉलेज जवळ, कोथरूड, मूळ रा. बेंगळुरू, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे व त्यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा तपास उपनिक्षक मोहन कळमकर करत असून, आरोपीच्या इतर गुन्ह्यांचा तपासही केला जात आहे.

गेल्या महिन्यात (दि. १७ मार्च) आंबेगाव बुद्रुक येथील शिलाई वर्ल्ड जवळील कोढरे बिल्डिंग येथे पहिल्या मजल्यावरील फ्लॅट भरदिवसा फोडून ऐवज लांबविला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी या घटनेची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार व्यंकटेश रमेश याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या घरफोड्या आंबेगाव, बावधन व लोणीकंद पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चालू वर्षातच केलेल्या आहेत. त्यानूसार, त्याला अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले. त्याच्याकडून दोन लाख ३४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या इमारतीत राहायचा

व्यंकटेश रमेश हा पुण्यात एकटाच राहायचा. त्याने कोथरूड येथे एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थी राहत असलेल्या इमारतीत राहण्यासाठी भाड्याने जागा मिळवली होती. तो उदरनिर्वाहासाठी काही करत नव्हता. तो फ्लॅटची रेकी करून दिवसा घरफोड्या करत असे, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी दिली.

दिवसा घरफोडी करणाऱ्याला अटक

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. हडपसर परिसरारील घरफोडीचा गुन्हाही त्याच्याकडून उघडकीस आला असून, एक लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मॉन्ट्या ऊर्फ आर्यन माने (वय २२ वर्षे, रा. वंदे मातरम चौक, रामटेकडी, हडपसर) असे अटक चोरट्याचे नाव आहे. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून तपास केला जात होता. खबऱ्याकडून पोलीस रेकॉर्डवरील आर्यन माने याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला शिताफीने अटक केली. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pune police has arrested a thief from another state nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार
1

Gurbir Singh: ‘ …म्हणून मुंबई प्रेस क्लबने केलेली हकालपट्टी’! कोर्टाचा अंतरिम दिलासा देण्यात नकार

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
2

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की  महागाई वाढेल?
3

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की महागाई वाढेल?

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ
4

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.