Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल; दोन दिवसात तब्बल…

दोन दिवस विशेष मोहिम राबवत पुणे पोलिसांनी शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2025 | 12:30 AM
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल; दोन दिवसात तब्बल...

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल; दोन दिवसात तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : गंगाधाममधील भीषण अपघातानंतर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत असून, दोन दिवस विशेष मोहिम राबवत पोलिसांनी शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच प्रवेश बंदी असलेल्या रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत तब्बल २४ अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल केले असून, ६४५ केसेस करून १० लाखांचा दंड आकारला आहे. तर, ड्रंक अँड ड्राईव्हत तब्बल ७२ केसेस करण्यात आल्या आहेत. यापुढेही ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

मार्केट यार्डच्या गंगाधाम चौकात तीन दिवसांपूर्वी एका बेदरकार ट्रक चालकाने सासरा व सुनेच्या दुचाकीला धडक दिली. यात एका ३० वर्षीय विवाहीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शहरात दिवसाच्या वेळेस अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली असताना हे वाहने फिरत असल्याचे सतत दिसून आलेले आहे. सातत्याने पोलीस त्यांना बंदी घालत असतानाही ते फिरत होते. काही ठराविक मार्ग हे ‘रेड झोन’ म्हणून घोषित केलेले आहेत. त्यांना पिकहावर्स तसेच काही ठरावीक वेळांसाठी हा मार्ग प्रवेश निषिद्ध आहे, असे स्पष्ट आदेश आहेत. तरीही हे वाहन चालक नियम पायदळी तुडवत रस्त्यावर उतरतात.

गेल्या अडीच वर्षांत शहरात २०० पेक्षा अधिक अपघातांमध्ये २१४ नागरिकांचा बळी गेला आहे. तर १९० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पोलिस विभागाने आता कडक धोरण स्वीकारत, नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेला धारेवर धरले होते. तसेच, बंदी असलेल्या रस्त्यांवर ही वाहने आल्यास त्यावर कडक कारवाई करून थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानूसार, तब्बल २४ गुन्हे नोंदवले आहेत.

मार्केटयार्ड, गंगाधाम, सिंहगड रोड, वाघोली, बाणेर, पौड फाटा तसेच वारजे या भागात अवजड वाहनांवर कारवाई करून २४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये ट्रक, जेसीबी डंपर अशा वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हे भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ (धोकादायक वाहनचालना) व कलम २२३ (सार्वजनिक रस्त्यावरून अपायकारक वस्तू नेण्यास मनाई) अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांची विशेष मोहिम (शुक्रवार व शनिवार)

  • दोन दिवसात अवजड वाहनांवर २४ गुन्हे दाखल
  • वाहतूक नियमांच्या ६४५ केसेस, १० लाखाचा दंड
  • ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोहिमेत ७२ केसेस
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासंदंर्भाने दोन दिवस विशेष मोहिम राबवली आहे. अवजड वाहने बंदी असणाऱ्या रस्त्यांवर तसेच बंदी असलेल्या वेळेत रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत २४ गुन्हे नोंद केले आहेत. यापुढे देखील कारवाई सुरू राहणार आहे. वाहने जप्तीची देखील कारवाई केली जाईल.– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

Web Title: Pune police has started directly registering cases against heavy vehicles violating the rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
2

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
3

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.