Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 29 लाखांचा ऐवज जप्त

हुशार अन् गंभीर गुन्ह्यांना अत्यंत साधेपणाने व शांत राहून गुन्हे करणाऱ्या एका कुविख्यात सराईताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2025 | 02:56 PM
पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 29 लाखांचा ऐवज जप्त

पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 29 लाखांचा ऐवज जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : हुशार अन् गंभीर गुन्ह्यांना अत्यंत साधेपणाने व शांत राहून गुन्हे करणाऱ्या एका कुविख्यात सराईताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २० गुन्ह्यांची उकल झाली असून, ३० लाखांचा ऐवज देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

जफर शहाजमान ईराणी (वय ४१, रा. लोणी काळभोर, पठारे वस्ती, मुळ. रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण घोडके, तपास पथकाचे उपनिरीक्षक मनोज बरूरे, सचिन कदम, अनिस शेख व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात चैन स्नॅचिंग करणारे तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना एकट्याला गाठून त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून हातचालाखीने दागिने व रोकड पळविण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसांना टोळ्या व चोरट्यांना जेरबंद करण्याच आदेश दिले होते. तर दुसरीकडे सराईतांवर नजर ठेवली जात असून, हद्दीतील हस्त व पेट्रोलिंग सुरूच आहे. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांच्या पथकाकडून शनिवार पेठेत भल्या सकाळी घडलेल्या सोन साखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास केला जात होता. तेव्हा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून जफर ईराणी याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासातून आरोपीने गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

जफर याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणूक, जबरी चोरी व चोरी असे २० गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच, रोख दीड लाख व सोन्याचे दागिने असा एकूण २९ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. जफर याने कोणाच्या साथीने हे गुन्हे केले आहेत का, त्याचे कोण कोण साथीदार आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Pune police has taken action by arresting a criminal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.