संग्रहित फोटो
बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६, रा. चिखलवाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप याची बिंदु ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट घेतलेला आहे. दरम्यान घटस्फोटानंतर दिलीपने बिंदु हिच्याशी विवाह केला. दोघेही चिखलवाडीत राहत होते. दरम्यान, बिंदु पती दिलीप पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा संशय होता. त्यावरून ती सातत्याने दिलीप याच्याशी वाद घालत. त्यावरून सातत्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. या रागातून दिलीप याने झोपेत असलेल्या पत्नीचा ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पती दिलीप याला अटक केली आहे. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…
तिघांनी केला तरुणाचा खून
बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.






