काय घडलं नेमकं?
पीडित नृत्यांगनाच नाव गायत्री तुषार सावंत (वय 26) असे आहे. तिची मैत्रीण प्रकाश जावळे हिच्यासोबत वास्तव्यास आहे. गायत्री सावंत हिने आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील पाच वर्षांपासून गायत्री आणि राहुल यांची ओळख होती. मात्र २०२४ पासून सोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.
5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली होती. त्यांनतर फिर्यादीने त्याचा फोन कट केला. यानंतर शुक्रवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गायत्री सावंत तिच्या खोलीत मैत्रीण मनीषा जावळे हिच्यासोबत होती. मनीषा बाल्कनीत गेली. त्याच वेळी आरोपी राहुल कचरे हा इमारतीजवळ दबा धरून बसलेला होता.
त्याने हातात कोयता घेऊन थेट फिर्यादीच्या खोलीत घुसून “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असे म्हणत गायत्री सावंतच्या बोटांवर, हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाला. यावेळी मैत्रीण मनीषा जावळे हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवीगाळ करत “मी तुला संपवून टाकणार आहे,” अशी धमकी दिली. त्यांनतर तिथून पळ काढला.
पीडित गायत्रीने आरोपी राहुल विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपस पोलीस करत आहे.
Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?
Ans: जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात.
Ans: एकतर्फी प्रेम, फोनवर बोलण्यास नकार व नंबर ब्लॉक केल्याचा राग.
Ans: गायत्री सावंत गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






