Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मटका किंग’ नंदकुमार नाईक स्थानबद्ध; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

पुणे शहरात अवैध धंद्यातील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२) याच्यावर पुणे पोलिसांनी एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2025 | 11:35 AM
'मटका किंग' नंदकुमार नाईक स्थानबद्ध; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

'मटका किंग' नंदकुमार नाईक स्थानबद्ध; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात अवैध धंद्यातील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७२) याच्यावर पुणे पोलिसांनी एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. आता एक वर्षासाठी मटका व जुगार किंग कारागृहात स्थानबद्ध असणार आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंद्यातील बडे-बडे मासे देखील भयभीत झाले असून, काहींनी शहराची हद्द सोडून दुसरीकडे आपला अवैध धंद्याचा संसार थाटला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

पुण्याचा मध्यभाग असलेला शुक्रवार पेठ परिसरात म्हणजेच खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नंदू नाईक अवैधरित्या मटका, जुगार व इतर अवैध धंदे चालवत होता. पूर्ण शहरात मटका किंग म्हणून त्याची ओळख होती. पोलीस दलात देखील त्याला आदबीने बोलले जात असल्याचे अनकेजण सांगतात. त्याने अनेक अधिकाऱ्यांना केलेल्या ऑफर देखील चर्चेत आहेत. त्याच्याविरोधात खडक पोलीस स्टेशन येथे एकूण ६३ गुन्हे नोंद आहेत, त्यापैकी २०२१ पासूनच अवैध मटका आणि जुगारासंदर्भात १२ गुन्हे दाखल झालेले आहेत.

पोलिसांकडून वेळोवेळी छापे टाकून त्याच्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती, मात्र तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्याच्या अवैध जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १७ मार्च २०२५ रोजी नंदकुमार नाईक याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला अटक करून नागपूर कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपआयुक्त संदिपसिंह गिल, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केली.

मोक्कानुसारही झाली होती कारवाई

मटका किंग नंदू नाईक या नावाने तो शहर व ग्रामीण भागात ओळखला जात होता. त्याच्यावर चार वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात बंडू आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई केली होती. तेव्हा नंदू नाईक याची टोळीला आर्थिक रसद पुरवत असल्यावरून मोक्का कारवाई झाली होती. मात्र नंतर हा मोक्काच न्यायालयात टिकला नाही. त्यापूर्वीच नंदू नाईकने न्यायालयातुन जामीन मिळवला होता.

नंदू नाईकचे अनेक खिस्से…

नंदू नाईक मटका किंग म्हणून जसा ओळखला जातो तसा तो राहणीमान आणि पोलीस दलात अधिकारी यांना अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या ऑफरमुळे देखील फेमस आहे. केवळ बनेल आणि हाफ किंवा फुल पॅन्टवर एका मोपेड गाडीवर फिरायलेला पाहिला मिळायचा. कोट्यवधी रुपये पाळून असलेला माणूस इतका साधा राहतो, अशीही त्याची चर्चा असते. मोपेड दुचाकीला देखील एक चालक असत. तो घेऊन नंदूला फिरवत असे. काही वर्षांपूर्वी कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून त्याचा हा अवैध धंदा पूर्ण बंद ठेवला होता. त्यावेळी नंदू नाईकने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली ऑफर चर्चेत आली होती. त्याने “साहेब, मला सुरू करू द्या, तुम्हाला निळा बॅरेल भरून पैसे देतो, अशी ऑफर दिली होती”. त्यावेळी अधिकारी यांनी हासून त्याला सांगितले होते, इथून पुढं माझ्याशी संपर्क करण्याचा किंवा मी असेपर्यंत चालू करण्याचा प्रयत्न देखील करू नको. ते तुला न परवडणारे ठरेल. संबंधित अधिकारी असेपर्यंत नंदू नाईकाच्य दुकानाला टाळे होते.

अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

शहरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Pune police has taken major action against matka king nandkumar naik nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Nasrapur Crime: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षेचा आज फैसला; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
1

Nasrapur Crime: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षेचा आज फैसला; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा भारतात ऐतिहासिक विस्तार; विक्रीत १६% वाढीसह महाराष्ट्रात अब्जावधींची नवी गुंतवणूक
2

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा भारतात ऐतिहासिक विस्तार; विक्रीत १६% वाढीसह महाराष्ट्रात अब्जावधींची नवी गुंतवणूक

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
3

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

सिंहगड एक्सप्रेससह अनेक लोकल रद्द, काही गाड्या उशिराने धावणार; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
4

सिंहगड एक्सप्रेससह अनेक लोकल रद्द, काही गाड्या उशिराने धावणार; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.