संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वासातील तरुणांना अन् गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांमध्ये पिस्तूल बाळगण्याची एक क्रेझ निर्माण झाल्याचे पाहिला मिळत असून, वारजे माळवाडी आणि पर्वती पोलिसांनी अशाच दोन तरुणांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूले जप्त केली आहेत.
वारजे माळवाडी पोलिसांनी यश विनय शहा (वय २५, रा. देशपांडे गार्डन सोसायटी, नर्हे) याला अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलिस शिपाई जी. डी. शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
वारजे माळवाडी पोलिस पोलिस गस्त घालत असताना माहिती मिळाली की, एक सराईत गुन्हेगार वारजे भागात फिरत असून, त्याच्याकडे पिस्तूल आहेत. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. तसेच, त्याला कात्रजकडे जाणाऱ्या मजुर अड्या शेजारील सर्व्हीस रोडवर पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाले. अधिक चौकशीत त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आले. यश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर भारती विद्यापीठ तसेच सिंहगड रोड भागात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पर्वती पोलिसांनी दुसरी कारवाई केली आहे. दत्तवाडी येथील शिवाजी चौकाजवळ बेकादेशिररित्या पिस्तुल बाळगणार्या एकाला बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई महेश मंडलीक यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, महेश मंडलिक व त्यांच्या पथकाने केली आहे.