(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब आणि हाडवणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओज इथे शेअर होत असतात आणि असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ नुकताच इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्यांनी सर्वच हादरून गेले असून यात चक्क एका भल्यामोठ्या जिवंत अजगराला चिमुकल्या मुंगळ्यांनी खाल्ल्याचे दिसून आले आहे. अजगरासारख्या जंगलातल्या शिकाऱ्याचा शेवट छोट्या मुंगळ्यांचा हातून होणं सर्वांनाच आश्चर्यचकित करणार दृश्य आहे. आता व्हिडीओत नक्की काय घडलं ते चला सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
मुंगळे हे शरीराने लहान असतात पण एकीचे ताकद ही नेहमीच मोठी असते हे आपण ऐकलं असेलच. व्हिडिओमध्ये याच एकीने मुंगळ्यांनी अजगरावर हल्ला केल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये सुरुवातीला मुंगळ्यांचा एक मोठा गट एका प्राण्याच्या अंगावर चढून त्याची शिकार करत असल्याचे दिसते आणि काही क्षणातच हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून अजगर असल्याचे आपल्याला समजते. अजगर जिवंत असतो आणि मुंगळ्यांच्या या हल्लयांतून तू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्नही करतो पण मुंगळ्यांची संख्या इतकी अफाट असते की त्यांच्यासमोर त्याला काहीच करता येत नाही. असेच काहीसे व्हिडिओमध्ये एका
गोमसोबतही घडताना दिसून येते. गोम मुंगळ्यांना वाटेत येते त्यानंतर मुंगळे तिला घेरतात आणि तिचाही नाश करून टाकतात. मुंगळ्यांच्या हल्ल्याचा हा थरार पाहून आता सर्वजणच चकित झाले आहेत. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नसून काहींनी हा व्हिडिओ AI क्रिएटेड असल्याचा अंदाज लावला आहे.
Snake invades ant territory and gets pulverized!
Nature tells us;
never underestimate any living creature, the community is stronger than one … pic.twitter.com/etMectpO5K— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 2, 2025
लहान जीवदेखील एकजुटीने कशा भल्याभल्यांवर भारी पडू शकतात याचे उदाहरण आपल्याला या व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळते. हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6.5 मिलियन व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यातला साप मेला की जिवंत राहिला?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला सापांचा भय आहे पण पहिल्यांदाच मला सापांबद्दल वाईट वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “विश्वासच बसत नाहीये की त्याला साधं पळताही आलं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.