Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा गेम ओव्हर; पोलिसांनी परदेशात लावली फिल्डिंग, आता थेट…

इंटरपोलकडून जारी केल्या जाणार्‍या सात रंगांच्या नोटिसांपैकी ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही नोटीस थेट अटक करण्याचा आदेश देत नाही. त्याचा उद्देश हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत निर्णायक

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2025 | 06:38 PM
Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा गेम ओव्हर; पोलिसांनी परदेशात लावली फिल्डिंग, आता थेट…
Follow Us
Follow Us:

निलेश घायवळला मिळणार इंटरपोलची नोटीस
भारत सरकारकडून होणार पाठपुरावा
पोलिसांनी सुरू केल्या वेगाने हालचाली

पुणे/Crime News: कुख्यात निलेश घायवळ याला थेट आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना (इंटरपोल) मार्फत ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात आली आहे.  भारत सरकारशी समन्वय साधून घायवळला ब्लु कार्नर नोटीस बजावण्यात आली आहे. घायवळ सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा ठावठिकाणा निश्चित होत नसल्यामुळे, अखेरीस तपास यंत्रणांनी इंटरपोलकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी धाव घेतली आहे. त्या मागणीनुसार इंटरपोलने ही महत्त्वपूर्ण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ म्हणजे काय?

इंटरपोलकडून जारी केल्या जाणार्‍या सात रंगांच्या नोटिसांपैकी ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही नोटीस थेट अटक करण्याचा आदेश देत नाही (अटकेसाठी ’रेड कॉर्नर नोटीस’ वापरावी लागते), परंतु त्याचा उद्देश हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. एखाद्या फरार व्यक्तीची ओळख, तिचा सध्याचा ठावठिकाणा आणि ती कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे, याबद्दलची माहिती गोळा करणे, हे या नोटीसचे मुख्य उद्दिष्ट असते.

या नोटीसमुळे इंटरपोलचे सदस्य असलेले तब्बल 196 देश तात्काळ सक्रिय होतात. याचा अर्थ असा की, गुंड निलेश घायवळ जगात कोणत्याही देशात लपून बसलेला असला तरी, तो एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये दिसल्यास, त्या देशातील स्थानिक पोलीस यंत्रणांना त्वरित त्याची माहिती इंटरपोल आणि भारताला कळवणे बंधनकारक ठरते. थोडक्यात, ही नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या गुन्हेगाराला ’वॉचलिस्ट’वर टाकणे असे म्हटले जाते.

गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या

 कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल मोक्काच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या गुन्ह्यात निलेश घायवळचा भाऊ तसेच पिस्तूल प्रकरणात चर्चेत आलेला सचिन घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.

गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

कोथरूड भागात कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीकडून एका तरुणावर शुल्लक कारणावरून गोळीबार तसेच दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले होते. या गुन्ह्यात निलेश घायवळचा समावेश समोर आल्यानंतर त्यालाही या गुन्ह्यात आरोपी केले होते. याच गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्याकडून सुरू होता.

Web Title: Pune police issued interpol blue corner notice against nilesh ghaywal kothrud firing case crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • crime news
  • Nilesh Ghaywal
  • Pune Police

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.