Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील एकाला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2026 | 12:30 AM
वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

Follow Us
Follow Us:
  • लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला उत्तर प्रदेशातून अटक
  • २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
  • सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघड
पुणे :  गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील एकाला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सोनसाखळ्या चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली.

विजयपाल कवर सैन (वय ३४, रा. इस्लामपूर घसौली, जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. त्‍याच्‍यासह अन्य पाच जणांनी मिळून या चोऱ्या केल्‍याचे तपासात समोर आले आहे. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, सहायक निरीक्षक राजेश महाला, अनिल सुरवसे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे यांच्यासह पोलिस अंमलदार नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, नितीन जाधव, चेतन होळकर, श्रीकांत वाघवले, अजिम शेख, यांच्‍या पथकाने ही कामगिरी केली आहे.

यातील तक्रारदार सागर कोमटी हे मित्रासह उभे असताना अनोळखी व्यक्तींनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील मोबाईल चोरला. नंतर त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखविला. लोखंडी कटरच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यापर्यंत पोहोचले. त्यानुसार पोलिसांनी विजयपाल सैन याला ताब्यात घेतले.

सहायक निरीक्षक अनिल सुरवसे यांनी केलेल्या तपासात त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीचा मोबाईल, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे सुद्धा वाचा : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: टोळीतील कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून विजयपाल कवर सैन (वय ३४) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

  • Que: पोलिसांनी या कारवाईत किती मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Que: या कारवाईत चोरीचे किती गुन्हे उघडकीस आले?

    Ans: पोलिसांनी सोनसाखळी चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Web Title: The police have arrested one member of a gang that was robbing ganesha devotees nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
1

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
2

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
3

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
4

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.