Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

पुण्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार पुन्हा शहरात आला आणि यावेळी त्याने गुन्ह्यासाठी चक्क पत्नीचीच साथ घेतली. भवानी पेठेतून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना खडक पोलिसांना कोंढव्यात त्याचा ठावठिकाणा लागला अन् चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 11:55 AM
तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

Follow Us
Follow Us:
  • तडीपार आरोपी वसीम पटेल कोंढव्यातून ताब्यात
  • पत्नीच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याचा प्रकार
  • वसीमवर १४ गंभीर गुन्हे दाखल
 

पुणे : पुणे शहरातून तडीपार केल्यानंतरही सराईत गुन्हेगारांची मुजोरी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तडीपारीचा आदेश धुडकावून शहरात छुप्या पद्धतीने वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने चक्क पत्नीच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याचा प्रकार खडक पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी तडीपार आरोपी वसीम सलीम पटेल (४२, रा. कोंढवा) याला ताब्यात घेतले आहे.

भवानी पेठेतून दुचाकी गायब

भवानी पेठेतील किराड आळी येथून २१ सप्टेंबरच्या रात्री एका नागरिकाची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे आणि पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली.

हेही वाचा: Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

कोंढव्यात छापा टाकून ताब्यात

मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोंढवा परिसरात छापा टाकला. या कारवाईत वसीम पटेल याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पत्नीच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तडीपार असतानाही तो शहरात लपून राहत असल्याचे समोर आले.

१४ गंभीर गुन्हे दाखल

वसीम पटेल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध चोरी, दरोडा, मारामारी यांसह तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कोंढवा पोलिसांनी २०२५ मध्ये त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा या कार्यक्षेत्रातून तडीपार केले होते. मात्र, तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पुन्हा शहरात लपून राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, चोरीच्या दुचाकीसह त्याच्या पत्नीच्या भूमिकेबाबतही तपास केला जात आहे.

Web Title: Pune tadipar criminal wasim patel bike theft wife khadak police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • bike
  • Bike Theft
  • Pune Crime
  • pune crime case
  • vehicle

संबंधित बातम्या

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली
1

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…
2

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
3

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
4

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.