
Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
मानसा : ‘उडता पंजाब’ या सिनेमातून पंजाबमधील अंमली पदार्थांच्या गंभीर समस्येचे चित्र समोर आले होते. मात्र, पंजाबमध्ये आजही अंमली पदार्थांविरोधातील लढा सुरूच असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मानसा येथे सोमवारी सकाळी अंमली पदार्थांविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, ते फेसबुक LIVE करत असतानाच हा गोळीबार झाल्याने संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
परविंदर सिंह झोटा हे अंमली पदार्थांविरोधात सक्रियपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. ते अँटी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख तसेच प्रसिद्ध समाजसेवक आणि माजी कबड्डीपटू होते. मानसा शहरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील एका मेडिकल स्टोअरमध्ये ते नशेविरोधात आवाज उठवण्यासाठी गेले होते. मेडिकल स्टोअर मालक अश्विनी यांच्यावर अंमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप करत परविंदर यांनी त्यांच्याशी जाब विचारला. त्यावेळी ते फेसबुक LIVEच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करत होते. याचवेळी दोघांमध्ये वाद वाढला.
पंजाब में नशे के खिलाफ आवाज उठाने वाले परविंदर सिंह की गोली मारकर हत्या! परविंदर के पिताजी ने AAP सरकार और मानसा के विधायक विजय सिंघल पर गंभीर आरोप लगाए है। वहीं, परविंदर की मां का दावा है कि परिवार को जान से मारने की धमकियां मिल रही थीं। अरविंद केजरीवाल और भगवंत मान, जवाब दो! – पंजाब में नशे के खिलाफ लड़ना जान जोखिम में डालना क्यों बन गया है?
– नशे के कारोबार पर लगाम लगाने के बजाय आवाज उठाने वालों की सुरक्षा भी नहीं कर पा रही AAP सरकार?
– आखिर इस नाकामी की जिम्मेदारी कौन लेगा? — BJP (@BJP4India) October 13, 2026
सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वाद वाढल्यानंतर मेडिकल स्टोअर मालकाने पिस्तूल काढून परविंदर यांच्यावर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. गोळी लागल्यानंतर परविंदर जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे धावत गेले. मात्र, काही अंतरावर असलेल्या एका दुकानात ते कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा हा संपूर्ण थरार फेसबुक LIVEमध्ये कैद झाल्याने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#WATCH | Chandigarh | On an anti-drug activist allegedly shot dead in Mansa, SAD leader Daljit Singh Cheema says, “The murder of Parvinder Jhota in Mansa, Punjab, today shook everyone’s spirits. He was a social activist, leading a movement against drugs and exposing those involved in the drug trade. He continued this work for five or six years. Whenever he received a complaint of drug abuse, he would go there and protest. The police even sent him to jail several times… Today, a chemist involved in the drug trafficking, pulled out a pistol and shot him while he was being interviewed live. This is a living example of the state of law and order in Punjab… The police themselves are not safe, and anti-drug activists are not safe. So, how is Bhagwant Mann’s government fighting the war against drugs? The government must take responsibility for this…” — ANI (@ANI) October 13, 2026
दरम्यान, अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कारवाई आणि मदतीसाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता, मात्र पोलिसांकडून वेळेत मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था आणि अंमली पदार्थांविरोधातील सरकारी कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या घटनेवरून आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये पोलीस आणि अंमली पदार्थांविरोधात लढणारे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील, तर सरकार अंमली पदार्थांविरोधातील युद्ध कसे लढणार, असा सवाल करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते दलजित सिंग चीमा यांनीही सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पंजाबमधील अंमली पदार्थांच्या समस्येविरोधात सुरू असलेल्या लढ्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.