Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

Asian Champions Trophy : एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून गोलकीपर कृष्ण बहादुर पाठकचे संघात पुनरागमन झाले आहे. ही स्पर्धा पंजाबमध्ये पार पडणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 05:50 PM
Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

Follow Us
Follow Us:
  • कृष्ण बहादूर पाठकचे पुुनरागमन 
  • पंजाबमध्ये रंगणार स्पर्धा
  • राखीव खेळाडूंमध्ये विष्णुकांत व अंगद सिंगला संधी
 

पंजाबमध्ये होणाऱ्या Asian Champions Trophy 2026 स्पर्धेसाठी हॉकी इंडिया (Hockey India) ने मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान जालंधर आणि मोहाली येथे ही स्पर्धा रंगणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत सिंग करणार असून, गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकचे संघात पुनरागमन झाले आहे.

जपानमध्ये झालेल्या Asian Games 2026 मध्ये भारताने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. त्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना Asian Champions Trophyसाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संघातील सातत्य टिकवून ठेवण्यावर निवड समितीने भर दिला आहे.

राखीव खेळाडूंमध्ये विष्णुकांत व अंगद सिंगला संधी

युवा डिफेंडर्स अमनदीप लकरा आणि मिडफिल्डर आदित्य अर्जुन लालागे यांनाही वरिष्ठ संघात आपली जागा मजबूत करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. मुख्य संघातील १८ खेळाडूंव्यतिरिक्त मिडफिल्डर विष्णुकांत सिंह आणि डिफेंडर्स अंगद बीर सिंग यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, पंजाबमध्ये Asian Champions Trophy खेळणे ही खास बाब असेल. या संघात युवा खेळाडूंचा उत्साह आणि अनुभवी खेळाडूंचे कौशल्य यांचा सुरेख मेळ आहे. मायदेशातील प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

The stage is set for another chapter of Hero Asian Champions Trophy in India. 🇮🇳 Punjab, get ready. Mark your calendar. The complete schedule has been released. 🏑 🗓️ Oct 27 to Nov 5
📍 Jalandhar & Mohali (Punjab, India)
#HockeyIndia #IndiaKaGame #HeroACT2026 https://t.co/Ij66NMdDCF — Hockey India (@TheHockeyIndia) October 9, 2026

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप

पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन

या स्पर्धेच्या निमित्ताने पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन होणार आहे. हॉकीच्या विकासात पंजाबचे मोठे योगदान असून, या राज्याने अनेक दर्जेदार खेळाडू देशाला दिले आहेत.

स्पर्धेतील सुरुवातीचे सामने जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियममध्ये 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान खेळवले जातील. त्यानंतर स्पर्धेतील महत्त्वाचे सामने मोहाली येथे होतील. 4 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने, तर 5 नोव्हेंबरला पदकांसाठीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत.

गतविजेता भारत या स्पर्धेतही विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाच वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले असून, या स्पर्धेच्या इतिहासातील तो सर्वाधिक यशस्वी संघ आहे.

माही पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 साठी धोनीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आशा

भारतीय पुरुष हॉकी संघ

गोलकीपर : सूरज करकेरा, कृष्ण बहादूर पाठक

डिफेंडर्स : संजय, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, जरमनप्रीत सिंह, अमनदीप लकरा

मिडफिल्डर : राजिंदर सिंह, आदित्य अर्जुन लालागे, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह

फॉरवर्ड : शिलानंद लकरा, अभिषेक, सुखजीत सिंह, दिलप्रीत सिंह, मनदीप सिंह

राखीव खेळाडू : विष्णुकांत सिंह, अंगद बीर सिंह

Web Title: India mens hockey team asian champions trophy 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Hockey
  • Punjab
  • Team India

संबंधित बातम्या

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
1

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.