Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई

रायगडमध्ये 2004 मधील खून प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज पांडवला 21 वर्षांनंतर अटक करण्यात आली. बकरीच्या वादातून प्रसाद ठाकूर यांची हत्या झाली होती. पोयनाड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पनवेलमधून आरोपीला पकडले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 01:52 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • बकरीच्या वादातून 2004 मध्ये खून
  • 21 वर्षे फरार आरोपी मनोज पांडव अटकेत
  • पोयनाड पोलिसांची गुप्त कारवाई यशस्वी
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बकरी मारल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 21 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. मनोज अशोक पांडव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

अलिबाग तालुक्यातील घेरा सागरगड वडवली येथे 2004 साली ही घटना घडली होती. मनोज याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृत अवस्थेत आढळून आली होती. या घटनेबाबत प्रसाद ठाकूर यानेच बकरी मारल्याचा संशय मनोजला आला होता. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून मनोज ने अलिबाग न्यायालयात प्रसाद ठाकूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणामुळे त्यांच्यातील वाद अधिकच वाढत गेला.

2 एप्रिल 2004 रोजी रात्रीच्या सुमारास मनोज याने प्रसाद ठाकूर याला एकटे गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात प्रसाद ठाकूर यांचा मृत्यू झाला या प्रकरणी गणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून कोयनाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी जयप्रकाश उर्फ जयेश मात्रे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Hyderabad Crime: 10 महिन्यांच्या लग्नाचा भयानक शेवट! गर्भवती सोशल मीडिया स्टारची निर्घृण हत्या; पती फरार

२१ वर्ष होता फरार

मनोज हा गेली 21 वर्ष पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र पोयनाळ पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे त्याचा माप काढत पनवेल येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अटकेनंतर मनोजला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

रायगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यापूर्वी सख्या मामाच्या पोरीशी आरोपीने लग्न केलं होत.या प्रकरणातील आरोपीचे नाव सतीश चव्हाण असे आहे. तर मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव निकिता राठोड (वय अंदाजे २२) असे नाव आहे. निकिता ही सतीशच्या सख्ख्या मामाची मुलगी आहे. विवाहानंतर दोघेही कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला दोघांचे संसारिक आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून सतत दोघांमध्ये वाद होत होते.

TamilNadu Crime: प्रेमातून विवाह केला, धर्मही बदल मात्र शेवटी ॲसिड हल्ला! एका डोळ्याची 50% दृष्टी गेली, तर…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कधी घडली होती?

    Ans: ही घटना 2 एप्रिल 2004 रोजी घडली होती.

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त तपासाच्या आधारे पनवेलमधून अटक केली.

  • Que: खून का करण्यात आला होता?

    Ans: बकरी मारल्याच्या संशयातून झालेल्या वादातून हा खून झाला होता.

Web Title: Raigad crime murder over a dispute involving a goat accused absconding for 21 years finally apprehendedmajor operation by raigad police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
2

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
3

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
4

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.