
crime (फोटो सौजन्य: social media)
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
१०८ रुग्णवाहिका सेवेला माहिती
ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तातडीने या घटनेची माहिती १०८ रुग्णवाहिका सेवेला देण्यात आली. माहिती मिळताच मांडल येथील १०८ रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक प्रभू प्रजापत आणि पुरुष नर्स गिरिराज पायक यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. झुडपात पडलेल्या नवजात शिशुला तात्काळ रुग्णवाहिकेतून बनेडा येथील सामुदायिक आरोग्या केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाच्या शरीरावर भटक्या जनावरांनी लचके तोडल्याच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच बनेडा पोलीस ठाण्याचे अधिकारीही तात्काळ रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन मोर्चरीत ठेवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. बाळाच्या अंगावरील जखमांना बघून अनेकांचे डोळे अश्रुने पाणावले.
पोलिसांकडून गावांमध्ये चौकशी केली जात आहे. एवढेच नाही तर अलीकडेच प्रसूती झालेली महिला, संशयित हालचाली, तसेच परिसरातील आरोग्य केंद्रांचीही माहिती घेतली जात आहे. नवजात बाळाला झुडपात ठेवणारी महिला कोण होती, या मागचे नेमके कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Sangli Crime: मावा मागणं बेतलं जीवावर! सांगलीत 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
Ans: राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील नानोदिया गावाजवळ.
Ans: झुडपात टाकल्यानंतर भटक्या जनावरांनी हल्ला केल्याने.
Ans: अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.