Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा

रत्नागिरीतील खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे येथे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनी सेजल भागवत हिचा मृत्यू झाला. शेवटचा पेपर देऊन ती मैत्रीण वैष्णवी अहिरेसोबत घरी परतत होती. अपघातात वैष्णवी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 09:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नर्सिंगचा शेवटचा पेपर देऊन घरी परतताना सेजल भागवतचा अपघातात मृत्यू.
  • दुचाकी घसरून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली.
  • मैत्रीण वैष्णवी अहिरे गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे
रत्नागिरी : भविष्याची असंख्य स्वप्ने डोळ्यांत साठवून नर्सिंगचा शेवटचा पेपर देऊन आनंदात घरी परतणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीचा काळाने घात केला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे परिसरात दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात सेजल भागवत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची बालमैत्रीण वैष्णवी अहिरे गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे भागवत कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात?

२५ जुलै रोजी नर्सिंगचा शेवटचा पेपर असल्याने दोन्ही मैत्रिणींमध्ये मोठा उत्साह होता. पेपर सुरळीत पार पडल्यानंतर दोघीही आनंदाने दुचाकीवरून आपल्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र, महाळुंगे येथील रस्त्यावरून जात असताना अचानक तिचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी वेगात घसरली. तीव्र वेगामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की सेजालच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणींना नाल्यातून बाहेर काढले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार

एकीची प्रकृती चिंताजनक

वैष्णवी अहिरे ही देखील या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली. तिच्यावर तातडीने वैधकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

रत्नागिरी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे आहे. सुनेनेच सासूला मारहाण केल्याचे समोर आले आहे. सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत सासू गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुगालयात दाखल केले. घडलेली घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव काय?

    Ans: सेजल भागवत.

  • Que: ही दुर्घटना कुठे घडली?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे परिसरात.

  • Que: अपघातावेळी दोघी कुठून परतत होत्या?

    Ans: नर्सिंगचा शेवटचा पेपर देऊन घरी परतत होत्या.

Web Title: Ratnagiri accident news she set off happily after finishing her final exam her two wheeler skidded and tragedy strucka 22 year old nursing student lost her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • crime
  • Ratnagiri
  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार
1

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
2

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
3

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं
4

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.