कसा झाला अपघात?
गौरी प्रमोद धर्माळे (वय 27) आणि हर्षा आदेश गावंडे (वय 39) अशी अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. बांधकाम साहित्याच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर राजापेठ उड्डाणपूलावर वाहनांची मोठी रांग लागली होती, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचं दिसून आलं.
पुण्यात दोन सख्ख्या भावांवर हल्ला, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?
कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
अमरावती येथून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरपंचासह ७ आरोपींना अटक केली आहे. यात सरपंचासह ५ मुख्य आरोपी सामील आहेत. घडलेली घटना अमरावती येथील वलगाव येथे घडली. या दुहेरी घटनेने अमरावती हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.
वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी सरपंचासुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलीस करत आहे. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
Ans: दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: तो घटनास्थळावरून फरार झाला.
Ans: अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर.






