Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : अपघात की घातापाताचा कट? खाडीकिनारी असलेल्या हॉटेलला भीषण आग

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 01:21 PM
Ratnagiri News : अपघात की घातापाताचा कट? खाडीकिनारी असलेल्या हॉटेलला भीषण आग
Follow Us
Close
Follow Us:
  • अपघात की घातापाताचा कट?
  • खाडीकिनारी असलेल्या हॉटेलला भीषण आग
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे हॉटेल सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ जलाल राजपुरकर यांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

घटनेनंतर आगीचे नेमके कारण काय याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वनवा लागल्याचे आढळून येत नसून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा त्यांना संशय आहे. त्यामुळे ही घटना अपघाती नसून घातपाताची असू शकते, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलच्या आवारात काही व्यक्ती अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्या वेळी जलाल राजपुरकर यांनी संबंधितांना पकडले असता त्यांच्याकडून धमकी देण्याचा तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सध्याची आग लावण्याची घटना अधिक संशयास्पद ठरत आहे.

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू

याशिवाय, हॉटेलजवळील जुन्या रस्त्यावरील पुलावर काही व्यक्ती नेहमीच मद्यप्राशन व इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही समोर येत आहे.या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकंदिरतच पोलीसांचा तपास सुरु असून अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र हा निव्वळ अपघात होता की कोणी घातपाताचा कट रचला होता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अशा घटनेमुळे देखील नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.

Gurugram Crime : 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप

Web Title: Ratnagiri news accident or conspiracy massive fire breaks out at hotel picnic point in khadipatta area of khed taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime news
  • fire Accident
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ
1

Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार
2

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार

Gurugram Crime :  3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप
3

Gurugram Crime : 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू
4

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.