शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर (फोटो- istockphoto)
शासकीय डॉक्टर खासगी सेवेत अधिक लक्ष देत असल्याचा आरोप
कायमस्वरुपी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी
रत्नागिरी आरोग्य विभागाकडे केली मागणी
गुहागर: गुहागर ग्रामीण रुग्णालातील डॉ. निलेशकुमार ढेरे हे पैशाच्या हव्यासापोटी खासगी रुग्णसेवेत अधिक रस देत असल्याने शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तालुक्यातील वरवेली येथील काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या डॉक्टरवर कारवाई करून येथे कायमस्वरुपी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी राहुल कनगुटकर यांनी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर अर्जात कनगुटकर यांनी म्हटले आहे, गुहागर ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर पूर्णवेळ रुग्णांची तपासणी न करता ते पूर्णवेळ खासगी रुग्णालयामध्ये पैसे कमावण्यासाठी घालवत आहेत. रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे पाहण्याची तसदीसुध्दा ते घेताना दिसत नाहीत. हे डॉक्टर कोणत्या नियमानुसार ग्रामीण रुग्णालय तसेच आपल्या खासगी रुग्णालयामध्येसुध्दा प्रैक्टिस करीत असतात. याबाबत त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनसुध्दा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. यामागे संबंधीत वरिष्ठ अधिकारी यांचासुध्दा अप्रत्यक्षरित्या त्यांना सहकार्य असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी
काही दिवसांपूर्वी याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वरवेली येथील महिलेला आपले बाळ गमवावे लागले आहे व सदर महिला मरणाच्या दारातून वाचली आहे. अशा अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व राहुल कानगुटकर यांनी करत याचे निवेदन आमदार भास्कर जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी, तालुका आरोग्य अधिकारी गुहागर, जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
Salim Khan ११व्या दिवशीही आयसीयूमध्ये; Ranveer Singh आणि Alvira लीलावती रुग्णालयात दाखल
काही महिन्यांपूर्वी याबाबत संबंधित डॉक्टर यांना याबाबत त्यांच्या वतीने समज दिली होती, तरीसुध्दा सदर डॉक्टर आपल्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करताना दिसत नाहीत. तसेच आपण दोन्ही ठिकाणी माझे काम चालू ठेवणार असे ठणकावून सांगत आहेत. १५ दिवसांपूर्वी याबाबत संबंधित डॉ. ढेरे यांना जिल्हा शल्य चिकित्सक स्त्नागिरी यानी आमच्या समक्ष समज देऊन त्यांच्या वागणुकीबाबत लेखी स्वरुपात त्यांचे म्हणणे मागितले होते. परंतु चौकशी करता असे समजले की सदर डॉक्टर यांनी याबाबत कोणताही खुलाचा जिल्हा शक्य चिकित्सक यांच्याकडे सादर केला नसल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण रुग्णालयात असलेले एक्स-रे मशीन रिपोर्ट, ईसीजी रिपोर्ट चुकीचे येत असून येथील रुग्णांना ते स्वः ताच्या खासगी रुग्णालयात बोलावून थेटे रिपोर्ट काढावयास सांगतात असेही ते म्हणाले, रुग्णांनच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गुहागर वाशियांमधून होत आहे.






