Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

तुमचा जुना फोटो ८०च्या दशकातील रेट्रो स्टाइलमध्ये पाहायचा आहे? मग थांबा! कारण हा फोटो बनवण्याची एक लिंक तुमचा फोटोच नाही, तर मोबाईलमधील संवेदनशील माहितीही धोक्यात आणू शकते.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 22, 2026 | 04:31 PM
रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

Follow Us
Follow Us:
  • रेट्रो फोटोच्या नावाखाली सायबर स्कॅम!
  • फोटो एडिटिंगच्या बहाण्याने APK लिंक
  • एका क्लिकने मोबाईल डेटा धोक्यात!
नवी दिल्ली: सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देणारे रेट्रो फोटो सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. ८०च्या दशकातील लूकमध्ये स्वतःचे किंवा कुटुंबीयांचे फोटो तयार करण्याची क्रेझ वाढली आहे. मात्र, याच ट्रेंडचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. रेट्रो शैलीतील फोटो तयार करून देण्याच्या बहाण्याने WhatsApp आणि SMS द्वारे वापरकर्त्यांना बनावट लिंक पाठवल्या जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

फोटो तयार करण्यासाठी APK डाउनलोड करण्यास सांगितले जाते

सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांना फोटो तयार करण्यासाठी एखादे एडिटिंग किंवा AI ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अनेकदा यासाठी APK फाइल डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. मात्र, अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करून ॲप इन्स्टॉल केल्यास मोबाईलच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Permissions देताना सावध राहा

बनावट ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते SMS, नोटिफिकेशन्स, कॉन्टॅक्ट्स, डिव्हाइसची माहिती आणि इतर संवेदनशील डेटासाठी परवानग्या मागू शकते. वापरकर्त्याने या परवानग्या दिल्यास OTP किंवा बँकिंगशी संबंधित माहिती अनधिकृतपणे ॲक्सेस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ आकर्षक फोटो तयार करण्यासाठी अनोळखी ॲपला गरजेपेक्षा जास्त Permissions देणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

तुमच्या फोटोचाही होऊ शकतो गैरवापर

या फसवणुकीचा धोका केवळ मोबाईल किंवा बँकिंग माहितीपुरता मर्यादित नाही. वापरकर्त्यांकडून मिळवलेल्या उच्च-गुणवत्तेच्या चेहऱ्यांच्या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यताही आहे. अशा फोटोंच्या आधारे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल किंवा डीपफेक तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ॲप किंवा वेबसाइटवर वैयक्तिक फोटो अपलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे महत्त्वाचे आहे.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

WhatsApp किंवा SMS वरून आलेल्या अनोळखी फोटो-एडिटिंग किंवा AI ॲपच्या लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करू नये. कोणतेही AI किंवा फोटो-एडिटिंग ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याचा Developer, Reviews आणि मागितल्या जाणाऱ्या Permissions तपासाव्यात. एखादे ॲप आपल्या कामासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त परवानग्या मागत असल्यास ते इन्स्टॉल करणे टाळावे. आधीच संशयास्पद ॲप इन्स्टॉल केले असल्यास ते तातडीने अनइन्स्टॉल करावे. तसेच, अशा ॲपच्या वापरानंतर बँक खात्यातील व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या खात्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा

सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास वेळ न दवडता १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. रेट्रो फोटोचा ट्रेंड कितीही आकर्षक वाटत असला, तरी अनोळखी लिंक, APK फाइल आणि संशयास्पद ॲपपासून सावध राहणे आवश्यक आहे. ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.

Web Title: Retro photo scam whatsapp sms apk cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • cyber crime
  • cyber scam
  • New Delhi
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
1

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
2

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Whatsapp New Scam: WhatsApp वरून येतोय धोका! ओळखीच्या माणसाकडून फाईल आली तरी जपून उघडा
4

Whatsapp New Scam: WhatsApp वरून येतोय धोका! ओळखीच्या माणसाकडून फाईल आली तरी जपून उघडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.