श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांड सारखंच आणखी एक हत्या प्रकरण (Murder Case) दिल्लीत घडल्यानं पुन्हा एकदा दिल्लीचं नाव चर्चेत आलं आहे. आरोपी साहिल गहलोतने (वय,24) निर्घृणपणे त्याच्या लिव्ह इन पार्टनर निक्की यादवची हत्या केली. पोलिसांना तिचा मृतदेह (Girl Dead Body) ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला (Found In Dhaba Fridge) असुन आरोपी साहिलला अटक केली आहे. आता चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत असुन साहिलने आधी निक्कीला कारमध्ये फिरायला नेलं आणि वाटेत तिचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली आहे. एव्हढचं नव्हे तर तिचा मृतदेह गाडीच ठेवून तो दिल्लीच्या रस्त्यावर 40 किमीपर्यंत फिरत होता, अशीही माहिती समोर आली आहे.
[read_also content=”लग्नाच्या हट्ट धरल्याने लिव्ह इन पार्टनरची हत्या; मृतदेह फ्रिजमध्ये ठेवुन गावी जाऊन केलं दुसऱ्या मुलीशी लग्न, श्रद्धा हत्याकांडपासून प्रेरणा https://www.navarashtra.com/crime/nikki-found-in-the-fridge-after-4-days-sahil-brought-the-bride-after-killing-love-wanted-to-dispose-of-the-dead-body-like-aftab-nrps-369807.html”]
दिल्लीतील नजफगढमधील मित्रांव गावात राहणाऱ्या साहिलची 2018 मध्ये हरियाणातील झज्जर येथील असलेल्या निक्की यादवशी कोचिंग क्लासमधे मैत्री झाली. दोघेही उत्तम नगरमध्ये कोचिंग क्लासला जात होते. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली, आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दिल्लीतील बाबा हरिदास नगरमध्ये दोघं सोबत राहु लागले.
सर्व काही ठीक चालले होते. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली, पण गेल्या वर्षभरापासून साहिलच्या घरच्यांनी लग्नासाठी दबाव टाकला तेव्हापासून हा त्रास सुरू झाला. साहिलच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर निक्की आणि साहिलमध्ये वाद व्हायला लागले. त्यानंतर नेहमी नेहमीच्या वादाला कंटाळुन साहिलने तिची हत्या केली. घटनेच्या दिवशी साहिलने निकीला फोन करून सांगितले की, चल कारमध्ये फिरायला जाऊ. यानंतर साहिल निक्कीसोबत कारमध्ये फिरायला गेला. जिथे वाटेत त्याने निकीचा गळा आवळून खून केला. इतकेच नाही तर साहिलने दिल्लीच्या रस्त्यावर 40 किमीपर्यंत तिचा मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर ठेवुन फिरत राहिला. यानंतर त्याने कुटुंबाच्या पसंतीच्या मुलीशी लग्नही केले. निक्कीच्या हत्येनंतर चार दिवसांनी ही घटना उघडकीस आली.
निक्कीच्या हत्येनंतर साहिलने दुसरे लग्न केले. आपले रहस्य उघड होणार नाही असे त्याला वाटले. साहिलने चार दिवस निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. दुसरीकडे, तीन-चार दिवस निक्कीचे कुटुंबीयांता निक्कीशी संपर्क न झाल्याने त्यांनी गुन्हे शाखेतील त्यांच्या ओळखीच्या असलेल्या एका पोलिसांला याबद्दल माहिती दिली. निक्कीचा फोन लोकेशनचा शोध घेतला असता ते ढाब्याजवळ असल्याच पोलिसांना आढळलं. त्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, यापूर्वी एका मुलीची हत्या करून मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असे बोलले जात होते.