छत्रपती संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ (Photo Credit- AI)
प्रकरणात २० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. तिचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून ती सासरच्या कुटुंबासोबत राहत होती. २८ मार्च रोजी पतीने आधारकार्ड बनवायचे असल्याचे सांगून तिला बाहेर नेले. त्यावेळी सासू व दीरही सोबत होते. मात्र तिला आधार केंद्राऐवजी दर्ग्यात नेण्यात आले. तेथे ‘भुतबाधा झाली आहे’ असे सांगत अश्पाक नावाच्या व्यक्तीकडे तिला नेले. त्याने तिला औषधाचा वास देऊन अगरबत्ती लावून मंत्रोच्चार सुरू केले. पुढील तपास पोलिस करत आहे.
Beed Crime: धक्कादायक! अंबाजोगाईत निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
हा व्हिडिओ तिच्या भावाला पाठवण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी चौकशी केली असता आरोपींनी भुतबाधेचे कारण देत उर्मटपणे उत्तर दिले. पुढे २९ मार्च रोजी पीडितेच्या नातेवाईकांनी घरी जाऊन विचारणा केली असता ‘आता तिला नांदवणार नाही’ असे सांगत तिला माहेरी पाठवण्यात आले.
मंत्रोच्चार सुरू असताना सासूने तिचे केस मोकळे करून थपडा मारत जबरदस्तीने घुमण्यास भाग पाडले. त्यामुळे तिची मानसिक अवस्था बिघडली. काही वेळानंतर तिला घडलेला प्रकार आठवत नव्हता, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान रात्री उशिरा या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढण्यात आला.
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.






