वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच
Ashok Kharat Nashik : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला अटक केल्यापासून सुरू असलेल्या चौकशींमधून धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीकडून सुरू आहे. अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून त्यांनी तपासाला वेग दिला आहे. अशोक खरातच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे समोर येत असून दुसरीकडे पोलिसांकडून त्याच्याशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती सुरू आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, वासनेने अंध झालेल्या खरातने केवळ महिलांची फसवणूकच केली नाही, तर शरीरसुखाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी तो ‘शक्तीवर्धक’ औषधांचा अतिवापर करत होता. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटकाही आला होता. त्यावेळी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात त्याने उपचार घेतले. ज्या डॉक्टरने खरातवर उपचार केले तो डॉक्टरदेखील त्याचा भक्त होता. या डॉक्टरने खरातवर उपचार करून त्याचे प्राण वाचवले होते. आजही खरातच्या एका हाताची हालचार मर्यादित होते. पण तर चेहऱ्यातही थोडा बदल दिसून येतो.
दरम्यान, तपासात खरातने १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याची एचायव्ही टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह निघाली. ही टेस्ट पोलीस कोठडीतच करण्यात आली होती. भविष्य सांगण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या बहाण्याने खरात महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहेत.
त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, भोंदू बाबा अशोक खरात याच्या अत्याचाराची व्याप्ती वाढत असून आता दोन उच्चपदस्थ महिला अधिकारीही त्याच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिला अधिकाऱ्यांनी स्वतःसोबतच इतर अनेक महिलांनाही खरातच्या संपर्कात आणल्याने खळबळ उडाली आहे.
यातील एका महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे संबंधित महिला आज तक्रार दाखल करण्याची दाट शक्यता आहे. पीडित महिला अधिकाऱ्याने एसआयटीशी (SIT) संपर्क साधला असून, पोलीस या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहेत.
खरातने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओ आधीच समोर आले असून, तपासात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे. यासह खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे.






