Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; ED ची छापेमारी, एकास अटक तर…

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र झाली असून, पहाटेपासून फलटण व कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2025 | 07:22 PM
मोठी बातमी! यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; ED ची छापेमारी, एकास अटक तर...

मोठी बातमी! यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; ED ची छापेमारी, एकास अटक तर...

Follow Us
Close
Follow Us:

यशवंत बँक अपहार प्रकरणात मोठी कारवाई
तब्बल 112 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
एकास अटक तर दुसऱ्यास पोलिस कोठडी

कराड: फलटण (जि. सातारा) येथील यशवंत सहकारी बँकेत झालेल्या तब्बल ११२ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी तपासाचा फास अधिक आवळत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी (रा. पुणे) याला अटक केली आहे. कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवार, दि. २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र झाली असून, मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेपासून फलटण व कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापासत्रात सुमारे १६ तासांहून अधिक काळ कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी या अपहारप्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते.

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहारप्रकरणी शेखर चरेगावकर, शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, त्यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी यांच्यासह इतर सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बँकेच्या ठेवीदारांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत संपूर्ण अपहारप्रकरणाची ईडीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच ईडीने फलटण, कराड व परिसरात छापासत्र राबवून बँकेच्या शाखांमध्ये जाऊन चौकशी करत आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.

या छाप्यादरम्यान, शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह दोन जणांची प्राथमिक चौकशी करून त्यांना आवश्यक माहिती घेऊन सोडण्यात आले, तर पाच जणांना मुंबई येथे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड

दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी याच्यासह अन्य आठ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतरच सातारा आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री शौनक कुलकर्णीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. बुधवारी, दि. २४ रोजी त्याला कराड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यशवंत बँक अपहारप्रकरणी ईडीकडून कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Satara crime branch arrested 2 persons yashwant bank money laundering case ed raid karad news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • crime news
  • Enforcement Directorate
  • Money Laundering

संबंधित बातम्या

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
1

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही
2

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह
3

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
4

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.