Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Drugs Case: एकनाथ शिंदेच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचे ड्रग्ज जप्त….; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप

सावरी गावातील कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात स्विमिंग टँक, रिसॉर्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. गाव किंवा वस्ती नसतानाही ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 17, 2025 | 04:58 PM
Satara crime news

Satara crime news

Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदेंच्या भावच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींची ड्रग्ज कारवाई
  • पोलिसांनी प्रकरण दाबले
  • प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ
Satara crime news: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील रिसॉर्टमध्यो पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्ज साठा सापडला होता. या ड्रग्जची किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे. पण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे प्रकरण लपवून ठेवले, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश शिंदे यांनी 2017 मध्ये ठाण्यातून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत प्रकाश शिंदे आणि या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पोलिसांनी ड्रग्जसंबंधित ज्या तीन जणांची नावे एफआयआरमध्ये असायला हवी होती. ती त्यात नोंदवली नाहीत. एखाद्या प्रकरणात पोराचे नावं आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो. मग आता ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे. अशी मागणीही अंधारे यांनी केली.

‘अडानी भाई को पायलटो का सप्लायर बनाना है…’; इंडिगो क्रायसिसवरून मोदी-अडानींवर काँग्रेसचा नवा Video Viral

 

या पत्रकार परिषदेनंतर मला जर काहीही झालं तर मी आज ज्यांची नावे घेतली आहेत. ते सर्व लोक जबाबदार असतील, हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळए माझीही सुरक्षा धोक्यात आली आहे. असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सुरक्षेची हमी द्यावी, यापूर्वी अॅड. उके आणि त्यानंतर नबाव मलिक यांनीदेखील या प्रकरणचे काही मुद्दे समोर आणले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे सर्वांनी पाहिलं होतं. याकडेही सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं.

Sushma Andhare : १४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणावर सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी १३ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात झालेल्या ड्रग्स कारवाईबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. सुरुवातीला मुकंद गावात झालेल्या कारवाईचे धागेदोरे पुण्याशी जोडले गेले. या प्रकरणात विशाल मोरेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मोरेच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले, असे अंधारे यांनी नमूद केले.

पाकिस्तानचा गेम ओव्हर! भारताचे मोठे यश; Pahalgam Terrorist Attack प्रकरणी एनआयएने थेट

सावरी गावातील कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात स्विमिंग टँक, रिसॉर्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. गाव किंवा वस्ती नसतानाही ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या रिसॉर्टमध्ये सात ते आठ खोल्या, विविध सुविधा आणि डस्टर गाडी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईत येथे ४५ किलो ड्रग्स सापडले असून त्याची अंदाजे किंमत १४५ कोटी रुपये असल्याचा दावा अंधारे यांनी केला. मात्र, ही बातमी फारशी चर्चेत आली नाही, असा आरोप त्यांनी केला.

हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असून शेडचा मालक गोविंद सिंदकर असल्याचे सांगितले जाते. शेडची चावी ओंकार दिघे याने घेतल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ओंकार दिघे याला ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले; त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. मुंबई पोलीस तेथे का गेले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘ये पॉलिटिक्स है बाबू भैया’! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच…

अंधारे यांनी रणजीत शिंदे हे एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख आणि सरपंच असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून, २०१७ मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती, अशी माहिती दिली. पोलिस रेकॉर्डनुसार, या ठिकाणी तीन जण राहत होते, ते आसाम किंवा बांगलादेशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तिघांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत, एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या रिसॉर्टचे नाव ‘हॉटेल तेजयश’ असून ते प्रकाश शिंदे यांच्या मुलांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. संपूर्ण प्रकरणात माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

 

 

Web Title: Satara drugs case drugs worth 145 crore seized from eknath shindes brothers resort sushma andhare makes a sensational allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Drugs News
  • Eknath Shinde
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
1

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन
2

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन

Dharashiv ZP Politics: धाराशिवच्या ‘शिंदे सेनेत’ उभी फूट! सभापती पदावरून बड्या नेत्याचा राजीनाम्याचा इशारा
3

Dharashiv ZP Politics: धाराशिवच्या ‘शिंदे सेनेत’ उभी फूट! सभापती पदावरून बड्या नेत्याचा राजीनाम्याचा इशारा

Ahilyanagar News: कर्जतमध्ये भाजपाची ‘इनकमिंग’ वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!
4

Ahilyanagar News: कर्जतमध्ये भाजपाची ‘इनकमिंग’ वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.