Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ३५.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2026 | 06:44 PM
डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
  • अमेरिकन नागरिकांची फसवणूक; १७ जण ताब्यात
  • लाखोंचा मुद्देमाल जप्त
सातारा : अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अमेरिकन नागरिकांचा डेटा समाविष्ट आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी” या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

Twisha Sharma Case मध्ये ट्विस्ट; पती समर्थ सिंगबाबत कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

पोलिसांनी केलेल्या छाप्यात कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील आणि २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह विरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दिपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

प्राथमिक तपासात आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून “तुमच्या नावाने अॅमेझॉनवरून खरेदी झाली आहे” असे सांगत होते. संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारल्यास बनावट ऑर्डर क्रमांक व मेसेज पाठवून विश्वास निर्माण केला जात होता. त्यानंतर “ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करा” किंवा “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत पैसे उकळले जात होते. फसवणुकीसाठी प्रामुख्याने डॉलर व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अमेरिकन तपास यंत्रणांशी समन्वयाची शक्यता

या सायबर फसवणुकीचे धागेदोरे परदेशाशी संबंधित असल्याने सातारा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांची मदत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. “डिजिटल अरेस्ट”, बनावट ई-कॉमर्स व्यवहार आणि गिफ्ट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु

Web Title: Satara fake call center busted american citizens online fraud 17 detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • Fake Call
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
1

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
3

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
4

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.