अमेरिका-इस्रायली हल्ल्यात श्रीनगरमधील शिया मुस्लिमांनी खमेनी यांच्या निधनावर निदर्शन केले (फोटो - istock)
अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका-इस्रायली ऑपरेशन “ऑपरेशन एपिक फ्युरी” हे येथील अनेक लोक इस्लाम आणि विशेषतः शिया मुस्लिम समुदायावरील हल्ला मानतात. या ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक इराणी नेत्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. भारतामध्ये देखील शेकडो निदर्शक खामेनींचे मोठे फोटो आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सतत “खामेनी चिरंजीव होवो” आणि “अमेरिका आणि इस्रायल मुर्दावाद” अशा घोषणा दिल्या, ज्या त्यांच्या तीव्र संताप आणि विरोधाचे प्रतिक आहे. काश्मीरमध्ये या हल्ल्याचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच हा हल्ला भ्याड असल्याचे देखील म्हटले आहे.
हे देखील वाचा : शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास
अमेरिका-इस्रायल हल्ल्यात अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येचा श्रीनगरमधील शिया मुस्लिमांनी निषेध केला.शिया मुस्लीमांनी आमचा नेता मारल्याचे कधी विसरणार नाही असे म्हणत शोक व्यक्त केला आहे. निदर्शकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलकांनी खमेनींचे फोटो आणि इराणला पाठिंबा देणारे बॅनर घेतले होते. श्रीनगरच्या रस्त्यांवर काळे झेंडे, अयातुल्लाचे फोटो आणि पारंपारिक शोकगीते (नौहा) म्हटली जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मात्र निषेध शांततापूर्ण वातावरणामध्ये केला जात असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.
हा हल्ला केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण नाही तर
काश्मीरमधील या निदर्शनांमागे खोलवर धार्मिक आणि राजकीय कारणे जोडलेली आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांना काश्मीरमध्ये एक इस्लामिक क्रांतिकारी आणि पॅलेस्टिनी समर्थक नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी इराणने काश्मीर मुद्द्याला, विशेषतः शिया समुदाय आणि इराण समर्थकांना दीर्घकाळापासून पाठिंबा दिला आहे. भारतामध्ये देखील त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांना इस्लामिक एकता आणि शिया मुस्लिम समुदायाचे प्रतीक मानले जात होते. मात्र त्यांच्या या हत्येमुळे संर्व शिया मुस्लीम आक्रमक आणि शोकाकुळ झाले आहेत. हा हल्ला केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण नाही तर धार्मिक आणि सांप्रदायिक भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे याचे पडसाद भारतामध्ये देखील दिसून येत आहे.
हे देखील वाचा : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबद्दल शिया समुदायाचे नेते सय्यद समर काझमी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, “आपण पहिल्यांदाच नेता गमावला नाही, परंतु आपल्या प्रिय नेत्याचा मृत्यू आपण विसरणार नाही. अमेरिका आणि इस्रायलने आपल्या नेत्याला फसवणुकीने कसे मारले हे आपण आपल्या पिढ्यांना सांगू… मुस्लिमांचा एक भाग नेहमीच प्रिय नेत्याच्या मार्गावर राहिला आहे आणि नेहमीच म्हणतो की आपण नेहमीच अत्याचारितांसाठी आवाज उठवू… जग शांत असताना पॅलेस्टाईनमधील हत्याकांडांसाठी आवाज उठवल्यामुळेच त्याला मारण्यात आले, अशी भूमिका काश्मीरी शिया बांधवांनी घेतली आहे.






