एसएमडब्ल्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची फ्रॉड केस बॅकेंकडे गहाण असलेल्या फ्लॅट्सची विक्री केली (फोटो - सोशल मीडिया)
दुहेरी विक्रीचा आरोप
पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वे क्र. 63/7 मधील फ्लॅट क्र. 19 व 20 येथे प्रकल्प उभारण्यात आला होता. सदनिका क्रमांक 101, 102 आणि 105 या फ्लॅटचा पूर्ण मोबदला स्वीकारून चंद्रकांत ठोंबरे यांच्यासोबत करार करण्यात आला. मात्र त्याच सदनिकांची नंतर इतर तिघांना नोंदणीकृत करारनाम्याद्वारे विक्री केल्याचे उघड झाले.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘CBI चौकशीतून…’
बँकेत गहाण — ग्राहकांना माहिती नाही
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, प्रकल्पातील ९ सदनिका व ४ व्यापारी गाळे सुमारे १ कोटी रुपयांच्या कर्जासाठी नांदेड मर्चंट बँकेत गहाण ठेवण्यात आले होते. ही माहिती ग्राहकांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. नियमबाह्य ताबा देण्यात आला असून तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे.
हे देखील वाचा : पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास
या सर्व गैरप्रकारांमध्ये बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) न घेता ताबा देणे, भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) नसताना राहायला देणे. ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेचा स्वतंत्र खात्यात हिशोब न ठेवणे, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम 1963 (MOFA) अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वडगाव मावळ शहरात खळबळ उडाली असून, घर खरेदी करताना कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






