Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम

वैष्णवी हगवणेचा पती अन् दिराला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना विशेष मेहरबानी केल्याचे दिसत असून, सामान्य नागरिकांना अर्धा वर्ष किंवा वर्षभराची वाट शस्त्र परवाना मिळवताना पहावी लागते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2025 | 11:35 AM
हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम

हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वैष्णवी हगवणेचा पती अन् दिराला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना विशेष मेहरबानी केल्याचे दिसत असून, सामान्य नागरिकांना अर्धा वर्ष किंवा वर्षभराची वाट शस्त्र परवाना मिळवताना पहावी लागते. मात्र, हगवणे बंधूंना केवळ सव्वा महिन्यात पुर्ण प्रक्रिया पार पाडून सुपर फास्ट पद्धतीने पिस्तूल परवाना देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही विशेष मेहरबानी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिस्तूल परवान्यासाठी अर्ज करताना खोटा पत्ता दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शशांक हगवणे याने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी वारजेतील एका वन बीएचके फ्लॅटसाठी केवळ साडेतीन हजार रुपये भाडे आणि दहा हजार डिपॉझिटवर भाडेकरार केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, १३ ऑक्टोबरला त्याने पुणे पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला. अवघ्या ५ दिवसांत अर्ज वारजे पोलिसांकडे पडताळणीसाठी पोहोचला. एक महिन्याच्या आत, १५ नोव्हेंबरला कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून अर्जाला पुणे पोलीस आयुक्तालयात सहीसाठी पाठवण्यात आले. फक्त १ आठवड्याने म्हणजे, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी शशांकला शस्त्र परवाना देण्यात आला. या अर्जावर त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांची एनओसी होती.

सुशील हगवणे यानेही २८ सप्टेंबर २०२२ रोजी कोथरूडमध्ये वन रूम किचन फ्लॅटसाठी पाच हजार रुपये भाडे आणि दहा हजार डिपॉझिटवर भाडेकरार केला. ३० सप्टेंबरला त्याने कोथरूड पोलीस ठाण्याअंतर्गत शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. त्याचा अर्ज १९ ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयात पाठवला. १ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला परवान्याची मंजुरी मिळाली. सुशीलच्या अर्जावर त्याची पत्नी मयुरी हगवणे यांची एनओसी होती.

दरम्यान, एका व्यक्तीने ३१ मार्च २०२३ रोजी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज निकाली लागण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. पण, तीच प्रक्रिया हगवणे बंधूंसाठी ‘फास्ट ट्रॅक’ नुसार चालली आणि त्यांना परवाना मिळाला. यामुळे आता हा परवाना व ते देणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून आता याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शशांकने असा मिळवला परवाना

  • १२ ऑक्टोबर २०२२ : वारजे येथे सागर दांगट यांच्याशी भाडेकरार, १ बीएचके फ्लॅट साठी साडेतीन हजार रुपये भाडं आणि दहा हजार रुपये डिपॉझिट
  • १३ ऑक्टोबर २०२२: शस्त्र परवान्यासाठी पोलिस आयुक्तालयात अर्ज
  • १७ ऑक्टोबर २०२२ : अर्ज पडताळणीसाठी वारजे पोलिस ठाण्यात
  • १५ नोव्हेंबर २०२२ : कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अर्ज सहीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात
  • शस्त्र परवान्याच्या एनओसी वडील राजेंद्र हगवणे यांची सही.
  • २२ नोव्हेंबर २०२२: आयुक्तांची मंजुरी, अपर पोलीस आयुक्तांची अर्जावर सही, शशांकला मिळाला परवाना

कसा मिळवला सुशील हगवणेने शस्त्र परवाना?

  • २८ सप्टेंबर २०२२: कोथरूड येथे अनंत कंधारे यांच्याशी भाडेकरार
  • १ रूम किचन फ्लॅटसाठी ५ हजार रुपये भाडं, १० हजार डिपॉसिट
  • ३० सप्टेंबर २०२२: शस्त्र परवान्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज.
  • १९ ऑक्टोबर २०२२: कोथरूड पोलिसांकडून अर्ज पोलीस आयुक्तालयात
  • १ नोव्हेंबर २०२२: पोलीस आयुक्तांची मंजुरी, अपर पोलिसांची सही, सुशीलला मिळाला परवाना, शस्त्र परवान्याच्या एनओसीवर पत्नी मयुरी हगवणे यांची सही

Web Title: Shashank and sushil are facing charges after the police issued them arms licenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Pune Crime
  • Rajendra Hagavane
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
1

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.