Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

Sherewadi double murder case : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांची सोन्याच्या दागिन्यांसाठी हत्या केल्याच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी २५ वर्षीय विकास उर्फ आप्पा राजेंद्र लडकत याला अटक करण्यात आली असून, त्याने दोन्ही महिलांची कोयत्याने हत्या केल्याची कबुली दिली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 05, 2026 | 08:50 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढण्यात आले  
  • हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती 
  • चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक तपास सुरू आहे  
 

Sherewadi double murder case : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे घरात घुसून दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याच्या दुहेरी हत्याकांडाचा बारामती पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी विकास उर्फ आप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढण्यात आले

शेरेवाडी येथे अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या हिंदूमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५), दोघी रा. शेरेवाडी, यांच्या अंगावरील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने शेरेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान विकास उर्फ आप्पा लडकत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करून विश्वासात घेतले असता त्याने सोन्याचे दागिने चोरी करण्यासाठी भावकीतील दोन्ही महिलांवर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली अशी  माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक तपास सुरू आहे

आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाली आहे. या कारवाईची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने नेमका कोणत्या उद्देशाने गुन्हा केला, हत्येसाठी वापरलेले हत्यार, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

 

Web Title: Sherrewadi double murder case baramati 25 year old accused arrested sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • Baramati Crime News
  • Murder Case

संबंधित बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू
1

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
2

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर
3

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
4

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.