Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2025 | 04:12 PM
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता  शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे. तसेचं वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे- नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओसह त्यामध्ये असलेला तब्बल 53 किलो गांजा जप्त करत गांजा वाहतूक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे. गांजा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा : कोयत्याने तरुणावर हल्ला करणाऱ्या तिघांना बेड्या; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुणे शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Web Title: Shikrapur police have seized 53 kg of ganja along with two scorpios nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद
1

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…
2

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये
3

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…
4

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.