Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

शिरवळ येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 09:35 PM
शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

Follow Us
Follow Us:

शिरवळ, दि. २८ (प्रतिनिधी) : शिरवळ येथील एस.टी. बसस्थानक परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून सुमारे १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ एस.टी. बसस्थानक परिसरात एक युवक एमडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलगडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितावर पाळत ठेवली.

दरम्यान, मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. बाजारपेठ, शिरवळ) हा संशयित दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने घटनास्थळावरून वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत त्याला ताब्यात घेण्यात आले.

Buldhana News : मुलीला पळवून नेल्याचा आरोप; आरोपीला पोलिसांकडून संरक्षण? बुलढाण्यात पालकांचे आमरण उपोषण

त्यानंतर संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून संशयिताला अटक केली. यावेळी संशयिताच्या ताब्यातील दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून तिचा वापर अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला होता का, याचाही तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत, त्याचा पुरवठादार, विक्रीचे जाळे तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास शिरवळ पोलीस करीत आहेत. या प्रकरणी संशयिताविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Web Title: Shirwal md drugs seized youth arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Satara
  • Satara Crime
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
1

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट
2

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
3

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
4

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.