Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

पुणे शहरातील विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध दारू व्यवसायाविरोधात संताप व्यक्त होत असताना शिवसेनेने हडपसर परिसरात धडक कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 02:10 PM
हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध दारू व्यवसायाविरोधात संताप व्यक्त होत असताना शिवसेनेने हडपसर परिसरात धडक कारवाई केली आहे. कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या परिसरात तसेच साठे वस्ती भागात सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसैनिकांनी धडक देत शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट केला आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले.

 

यावेळी बोलताना प्रमोद भानगिरे यांनी अवैध दारू व्यवसायाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अवैध दारूभट्ट्या सर्वसामान्य नागरिकांना दिसतात, मग त्या पोलिसांना का दिसत नाहीत?” असा सवाल त्यांनी केला. तसेच शहरातील अनेक भागांत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

विषारी दारूमुळे नागरिकांचे जीव जात असताना संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हडपसर परिसरात अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि अन्य बेकायदेशीर धंद्यांविरोधात शिवसेना सातत्याने आवाज उठवत असून यापुढेही आमच्याकडून अशी मोहीम सुरु राहील, असा इशाराही भानगीरे यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : भीमाशंकर मंदिर ‘या’ तारखेपासून दर्शनासाठी खुले; दररोज फक्त 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीवर प्रवेश

यावेळी प्रवीण हिलगे, विक्रम घाडगे, रोहित भालचिंम, प्रकाश कालगुडे, गणेश साळुंखे, माऊली साळुंखे, रवी लोखंडे, सूरज खिल्लारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. शिवसेनेच्या या धडक मोहीमेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा : राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहिल्याच दिवशी मिळणार नवा गणवेश; निकृष्ट दर्जाचे कापड आढळल्यास थेट…

मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग (स्टेट एक्साईज) खडबडून जागा झाला आहे. शुक्रवारी अवैध दारूविरोधात धडक कारवाई करत विभागाने ५४ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ हजार ४८० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे ४२ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Shiv sena party has become aggressive over illegal village liquor in hadapsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • shivsena

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
3

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
4

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.