Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सदाशिव पेठेतील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून वाहनचालकाबाबत धक्कादायक माहिती उघड

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोर १२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2025 | 11:48 AM
सदाशिव पेठेतील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून वाहनचालकाबाबत धक्कादायक माहिती उघड

सदाशिव पेठेतील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून वाहनचालकाबाबत धक्कादायक माहिती उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोर १२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वाहन चालकाने मद्यपान केले होते. त्याला कार चालवता येत नाही, असे पोलीस तपासातून पुढे आले आहे. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे समोर आले आहे.

जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तर अपघातावेळी कारमध्ये असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय २७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवून देत सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी शनिवारी मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. शनिवारी (ता.३१) सायंकाळी भरधाव कारने चहा प्यायला थांबलेल्या १२ जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहोत. तर इतरांना उपचार घेऊन घरी पाठविण्यात आले आहे.

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची आज परिक्षा होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश फडतडे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : सोलापुरात अपघात! आजीच्या डोळ्यादेखत ६ वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं, जागीच मृत्यू

Web Title: Shocking information about the driver has been revealed during the investigation into the accident in sadashiv peth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.