जेजुरीजवळ भीषण अपघात; ८ जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
सोलापूरातून एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालं आहे. शिवांशु उर्फ बन्टु लक्ष्मीनारायण बोद्धूल असे या मृत चिमुकयाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (३१ मे) सोलापुरातील गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर घडली. जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षिकेचा ‘डिजिटल अरेस्ट’; IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेऊन ८३ लाखांची फसवणूक
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवांशु हा आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता. रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता क्रॉस करत होता. त्याचवेळी समोरून दोन मुली डबलशीट दुचाकीवर आल्या आणि शिवांशुला जोरात धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्यात जबर मार लागला. नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. परिणामी त्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवांशूच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भीषण अपघातात पती-पत्नी आणि मुलगी जखमी
एक कुटुंब चारचाकी वाहनाने नागपूरकडे जात होते. या दरम्यान समोरून आलेल्या भरधाव ट्रॅकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चारचाकी वाहनातील पती- पत्नी आणि मुलगी असे तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नागपूर- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भांडाराच्या बायपासवर रात्री घडली. जखमींना तातडीनं उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अजय जयस्वाल (55), कविता अजय जयस्वाल (50) आणि सुहानी जयस्वाल (22) असं जखमींचं नावं आहे.
दारूच्या नशेत भरधाव कार चालवत 12 विद्यार्थ्यांना चिरडलं; चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
पुण्यात सदाशिव पेठ येथे १२ विध्यार्थ्यांना कार चालकाने उडवल्याची घटना घडली होती. कार चालक दारू पिऊन कार चालवत होता. आता या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी चालकाला काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होत. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले होते. आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असतांना त्यांने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.