Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: आईने चिमुकल्याला विष पाजून स्वतः घेतला गळफास; 14 महिन्याच्या बाळाचा जीव थोडक्यात वाचला

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अंकिता उकिरडे या विवाहित महिलेनं आपल्या १४ महिन्याच्या मुलाला विष पाजून गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा अन्विकचा जीव वाचला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 09, 2025 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घटना वाणी प्लॉट, बार्शी येथे घडली.
  • मुलगा अन्विक वाचला असून रुग्णालयात उपचार सुरू.
  • पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात एका आईने आपल्या लहान मुलाला विष पाजून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे असून ती विवाहित होती. तिला १४ महिन्यांचा मुलगा होता. तिने प्रथम आपल्या मुलाला विष पाजले आणि नंतर साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

Akola News : अकोल्यातील शिक्षक व विद्यार्थ्याचा काशीद बीचवर बुडून मृत्यू; शैक्षणिक सहलीचा आनंद बदलला शोकात

काय घडलं नेमकं?

अंकिता हिचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात आपल्या चिमुकल्यासह एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या मोलकरणीला घरात कोणी दिसले नाही. संशय आल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, अंकिता सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तर चिमुकला अन्विक अत्यवस्थ अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळून आला.

बाळावर उपचार सुरू

घटनेनंतर तातडीने अन्विकला बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की मुलाने विष सेवन केले असले तरी त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे. मात्र त्याची प्रकृती अजूनही गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या या चिमुरड्याचे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

अंकिता उकिरडे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असून मानसिक ताण किंवा कौटुंबिक वाद हा कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर वाणी प्लॉट परिसरात तसेच बार्शी शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप चिमुकल्याला या दुर्घटनेचा सामना करावा लागत आहे, हे अधिक वेदनादायक आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील चौकशीअंती आत्महत्येचे खरे कारण उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कुठे घडली?

    Ans: बार्शी

  • Que: मृत महिलेचं नाव काय?

    Ans: अंकिता

  • Que: मुलाचं नाव काय आहे?

    Ans: अन्विक

Web Title: Solapur crime mother poisoned her child and hanged herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
2

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.