अकोला: अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गट शैक्षणिक सहलीसाठी गेला होता. मात्र या आनंददायी सहलीत असा एक अनर्थ घडला की सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. समुद्रात पोहत असताना अचानक आलेल्या लाटेमुळे एक शिक्षक आणि एक विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले.
Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…
काय घडलं नेमकं?
अकोल्यातील सुप्रसिद्ध शुअर विन क्लासेसचे १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक असे एकूण १५ जण शैक्षणिक सहलीसाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवर गेले होते. सहलीदरम्यान काही विद्यार्थी समुद्रात पोहत असताना अचानक मोठी लाट आली आणि दोन विद्यार्थी तसेच एक शिक्षक पाण्यात ओढले गेले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु त्यात शिक्षक आणि एका विद्यार्थ्याला वाचवण्यात अपयश आले.
या घटनेत शिक्षक राम कुटे (वय ६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर, अकोला) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय १९, अकोला) यांचा मृत्यू झाला आहे. आणखी एक विद्यार्थी आयुष बोबडे (वय १७) सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, राम कुटे यांचा मृतदेह बोर्ली येथे आणि आयुष रामटेकेचा मृतदेह मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे.
शिक्षकांचा मृत्यू शिक्षणविश्वासाठी धक्का:
राम कुटे हे अकोल्यातील नामांकित शुअर विन क्लासेसचे संचालक आणि लोकप्रिय शिक्षक होते. त्यांनी बारा ज्योर्तिलिंग परिसरात क्लास सुरू करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन दिले. नंतर त्यांनी तोष्णीवाल लेआऊट आणि बुलढाणा येथे नवीन शाखा सुरू केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले.
त्यांच्या अकस्मात निधनाने अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्यात दुःखाचे वातावरण आहे. कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्रशासनाने या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू केली असून, काशीद बीचवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…
Ans: काशीद
Ans: राम कुटे
Ans: आयुष






