Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून

करमाळा तालुक्यातील केम येथे शेतात सापडलेल्या मृतदेहाचा 24 तासांत उलगडा झाला. दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या बहिणीने पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून केला. पुरावा लपवण्यासाठी मृतदेह शेतात टाकला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 19, 2026 | 10:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतात सापडलेल्या मृतदेहाचा 24 तासांत उलगडा
  • दारूच्या त्रासातून बहिणीने भावाचा गळा आवळून खून
  • पतीच्या मदतीने मृतदेह शेतात टाकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील केम येथील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला. दारुच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सख्ख्या बहिणीनेच आपल्या पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

१२ एप्रिल २०२६ रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या मकवानाच्या (मक्याच्या) गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (३८) यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मल्हारी यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी अज्ञात व्यतींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नातेवाईक शीतल राजू केंगारे (बहीण) आणि राजेश बापू केंगारे (भावजी) यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी शीतल केंगारेने खुनाची कबुली दिली.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

कशी केली हत्या?

११ एप्रिलच्या रात्री तो दारू पियुन घरी आला आणि बहिणीशी भांडण करू लागला. या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापात शीतलने आपल्या ओढणीने मल्हारीचा गळा आवळला.यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शितल आणि तिचा पती राजेश या दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मल्हारीचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.

‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?.

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून नंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Yavatmal Crime: ‘मटण नीट शिजलं नाही’ म्हणून वाद; पतीच्या अपमानाने गृहिणीने विष प्राशन करून संपवलं जीवन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे.

  • Que: खुनामागचं कारण काय होतं?

    Ans: मृत व्यक्तीच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद होत होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: बहिण आणि तिच्या पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Solapur crime shocking incident in karmala fed up with his alcohol related harassment a sister strangles her own brother to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.