
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: पुण्यात संतापजनक प्रकार! बसस्टॉपवर महिलेसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव धनश्री पाटील असे आहे. तर आरोपी पतीचा नाव ऋषिकेश पाटील असे आहे. ऋषिकेश पाटील हा बजाज फायनान्समध्ये कार्यरत असून त्याची पत्नी धनश्री पाटील या IDFC फर्स्ट बँकेत नोकरी करत होत्या. सोमवारी बार्शी- परंडा रोडवरील एका बिअर बारसमोर ऋषिकेशने धनश्रीला अडवलं. त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपीने तब्बल ५० वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली.
या घटनेने परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी धनश्री यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्यांनाही शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्री यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील हा बार्शी सिटी पोलीस स्टेशन येथे हजर झाला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे दोघांनी प्रेम विवाह केला सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. प्रेमाची जागा संशयाने घेतल्याने नवरा इतका क्रूर बनवला की त्याने बायोकोला भर रस्त्यात क्रूरपणे संपवलंय.
Ans: हत्या झालेल्या महिलेचे नाव धनश्री पाटील होते.
Ans: आरोपी ऋषिकेश पाटील स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला.
Ans: वैवाहिक आयुष्यातील चारित्र्याच्या संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.