crime (फोटो सौजन्य: social media)
सोलापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली आहे. मुलीचा छळ आणि तिच्या मृत्यूमागील क्रूरता समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात चाललंय काय? टोळक्याचा चक्क पोलिसांवरच हल्ला; रस्त्यावर पाडून बेदम मारहाण
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नी तेजस्विनी हिच्यासह वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहतात. त्याच्यासोबत पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली कीर्ती आणि आकृतीही राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून नागेशची दुसरी पत्नी तेजस्विनी या दोन्ही मुलींवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होती. ती मुलींना क्षुल्लक कारणावरून मारहाण करत असल्याचे शेजारच्यांनी सांगितले होते.
शुक्रवारी सकाळी कीर्तीने नाश्ता करण्यास नकार दिला त्यामुळे तेजस्विनी संतप्त झाली. तिला अमानुषपणे मारहाण केली. आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.ही संतापजनक घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे असून, तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिनेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस्विनी कोकणे हिच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी तेजस्विनीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जन्मदात्या आईनं 6 महिन्यांच्या बाळाची उशीने तोंड दाबून केली हत्या
मुंबईच्या शिवाजीनगर परिसरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या ६ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोवंडीच्या बैंगणवाडी येथे घडली आहे. आरोपी महिलेने बाळ झोपाळ्यात झोपलेला असतांना उशीने मुलाचे तोंड दाबून हत्या केली. या हत्येनंतर महिला स्वतः पोलीस ठाण्यात गेली आणि हत्येची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यात भावाने केला भावावर गोळीबार; प्रकृती गंभीर