Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील राहत्या घरात घडली. आरोपी राहुल याने क्षुल्लक किंवा कोणतेही ठोस कारण नसताना आईला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2026 | 09:27 AM
मुलाकडून आईला कड्याने मारहाण

मुलाकडून आईला कड्याने मारहाण

Follow Us
Follow Us:

पुणे : वडिलांकडून मुलाचा खून अन् मुलाकडून आईचा खून झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शहरात ताज्या असतानाच, मुलाने कोणतेही कारण नसताना जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हातातील गोल कड्याने तोंडावर प्रहार केल्याने संबंधित ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या ओठाला तब्बल ८ टाके पडले आहेत.

याप्रकरणी आशा राजेंद्र सरोदे (वय ६०, रा. गोकुळनगर) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांचा मुलगा राहुल राजेंद्र सरोदे (वय ३३, रा. गोकुळनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील राहत्या घरात घडली. आरोपी राहुल याने क्षुल्लक किंवा कोणतेही ठोस कारण नसताना आईला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

Mamata Banerjee यांच्या भाचीचा मृत्यू की घातपात? घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, शिक्षक भरती प्रकरणानंतर गेली होती नोकरी

त्यानंतर त्याने स्वतःच्या उजव्या हातातील लोखंडी गोल कड्याने आईच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून, उपचारादरम्यान डॉक्टरांना ८ टाके घालावे लागले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार

पुण्यातील दुसऱ्या एका घटनेत, जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दत्त मंदिर चौकात घडली. याप्रकरणी शाहरुख सलीम बागवान (वय ३१, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुपेश मारुती कांबळे (वय ३८, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय अन्…

आरोपीने फिर्यादी यांच्याशी वाद घालत ‘तू पोलिसांचा खबरी आहेस,’ असा संशय घेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी तेथून निघून गनीबाबा दर्गाजवळ जाऊन बसले असता, आरोपी रुपेश तिथे पोहोचला. त्याने कमरेला लावलेला चाकू काढून शाहरुख यांच्या उजव्या मांडीवर व छातीच्या डाव्या बाजूला वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का ! बंगालनानंतर मेघालयातही आता भाजपचं ऑपरेशन लोटस? 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा

Web Title: Son brutally beats mother incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
1

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
4

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.