बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोने पतीला सोडून दिराशी लग्न केलं याचाच राग पतीला आलं आणि त्याने संतापात आपल्या सासूची हत्या केल्याचे समोर आहे. हा प्रकार बिहारच्या भागलपूर येथील शाहकुंडच्या गौरा गावात घडली आहे.
मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
नेमकं काय घडलं?
गौरा गावात राहणाऱ्या मोहम्मद आफताबचे ५ वर्षांपूर्वी शबनमशी लग्न झाले होते. आफताब सतत दारू प्यायचा आणि शबनमला मारहाण करत होता. अनेकदा पंचायती झाल्या, पण त्याच्या वागण्यात काही सुधार झाला नाही. तो पैसे कमावत नव्हता, घर खर्चासाठी पैसे देत नव्हता. तेव्हाच शबनम आणि आफ्ताबचा धाकटा भाऊ इम्तियाज यांच्यामध्ये जवळीक वाढली. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं. पण आफताबला हे पटलं नाही. त्याच्या डोक्यात राग होता.
त्याने रागाच्या भरात गुरुवारी उशिरा रात्रीच्या सुमारास जावई मोहम्मद आफताब शबनमच्या आईवर हल्ला केला. त्यावेळी शबनमची आई हि शेतात झोपली होती. ओरडण्याचा आवाज ऐकून शबनम धावत आली, तेव्हा आफताब घटनास्थळाहून पळून गेला. कुटुंबीयांनी शबनमच्या आईला ताबडतोब बीबी कौशरला जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच तिचा मृत्यू झाला.
चौकशी सुरु
ही घटना सजोर आणि मधुसूदनपुर पोलिस स्टेशनच्या सीमेवर आहे. यामुळे पोलिसांची चौकशी अद्याप सुरु झालेली नाही. मधुसूदनपुर पोलिस स्टेशनचे प्रमुख सफदर अली यांनी सांगितलं की, पोलिस पथकाला चौकशीसाठी पाठवलं आहे. तर सजोर पोलिस स्टेशन क्षेत्रातील कायद्याची व्यवस्था करणारे डीएसपी नवनीत कुमार यांचं म्हणणं आहे की, घटना मधुसूदनपुर पोलिस स्टेशन क्षेत्रात घडली आहे, तरीही पोलिस स्टेशन प्रमुखाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची चौकशी करण्यात येणार.
घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडित दुकानातून सामान घेऊन घरी परतत असतांना आरोपी तरुणाने तिला वाटेतच थांबावल आणि तिला शाळेत नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना बिहारमधील हाजीपूर येथील भागवणपूर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी घडली. पीडिता ही अल्पवयीन १३ वर्षीय मुलगी आहे.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी किराणा दुकानातून सामान घरी परतत होती. त्यावेळी गावातील एका तरुणाने तिला वाटेतच अडवलं आणि पीडितेचं तोंड दाबून तिला जवळच्या सरकारी शाळेत नेलं. त्या ठिकाणी आरोपी तरुणाने पिडीतेसोबत घृणास्पद कृत्य केलं. घटनेनंतर, पीडित तरुणी कशीबशी घरी पोहोचली आणि कुटुंबियांना या प्रकरणासंबंधी माहिती दिली.
बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन