फोटो सौजन्य - सोशल मिडिया
41 वर्षानंतर आशिया कप फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा संघ हा पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळला. आशिया कप 2025 च्या फायनल आधी भारताच्या संघाने पाकिस्तान विरुद्ध दोनदा सामना केला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध विजयाचे हॅट्रिक मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचा सुपर चारचा शेवटचा सामना हा श्रीलंके विरुद्ध झाला या सामन्यांमध्ये सुपर ओवर खेळवण्यात आली होती. या रोमांचक सामन्यांमध्ये भारताच्या संघाचे दोन खेळाडू हे फील्डिंग करताना लागलेल्या दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडावे लागले होते. यामध्ये भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अभिषेक शर्मा यांचा समावेश होता. अभिषेक शर्मा याच्या दुखापती बद्दल संघाचे कोच मार्केल याने अपडेट दिल्या होत्या पण हार्दिक पांड्या बद्दल त्यांनी कोणत्याही अपडेट दिली नव्हता.
Hardik Pandya missing out tomorrow will be a huge loss. I would play a half fit pandya as he is our OG player, clutch god, man of the big occasions. Stay strong & fit – Kung Fu Pandya💥 pic.twitter.com/dVPnRdZW0f — Akshat (@Akshatgoel1408) September 27, 2025
हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचा एक मुख्य खेळाडू आहे. तो पावर प्लेमध्ये गोलंदाजी देखील करतो त्याचबरोबर जेव्हा टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची त्याचबरोबर टीम इंडियाचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या फलंदाजीची गरज लागते. बऱ्याचदा हार्दिक पांड्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. टीम इंडियाने २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर फोर सामना खेळला. संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही.
सामन्यानंतर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी सांगितले की हार्दिकला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. आता मोठा प्रश्न असा आहे की जर हार्दिक पंड्याची दुखापत अधिक गंभीर असेल आणि तो अंतिम फेरीतून बाहेर पडला तर त्याच्या जागी कोण खेळेल? शिवम दुबे आधीच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे, त्यामुळे टीम इंडिया अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड करू शकते, ही भूमिका अर्शदीप सिंग पूर्णपणे फिट बसते.
जरी अर्शदीप सिंग शेवटचा श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसला असला तरी, त्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, ज्यामुळे अर्शदीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. आता, जसप्रीत बुमराह देखील अंतिम फेरीसाठी परतेल आणि टीम इंडिया बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचे संयोजन मैदानात उतरवू शकते.