(फोटो सौजन्य: X)
आईचे प्रेम हे या जगातील सर्वात निस्वार्थी प्रेम आहे, ज्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. ममतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही आई वेळ आली तर रुद्रावतार घेऊन शत्रूंचा संहार देखील करु शकते. आपल्या मुलाला संकाटातून वाचवण्यासाठी ती वाटेल त्या थराला जाते, मग जीव गेला तरी बेहत्तर. आईच्या मायेचा आणि धैर्याचा अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात मुलाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारी आई दिसून आली. आपल्या मुलासाठी तिने स्वत:चा जीव धोक्यात घातला बरा पण शेवटी नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
गर्दीचा फायदा घेत महिलेने दुकानातून केली चोरी, पकडले जाताच लोकांनी केली बेदम मारहाण; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
जंगलात शिकारीचे अनेक दृश्य दिसून येतात. असेच एक दृश्य आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये जंगलातील धोकादायक शिकारी साप एका खारीच्या पिल्लावर हल्ला करत असल्याचे दिसून येते. पण जेव्हा त्याच्या आईला हे समजते ती कोणताही विचार न करता लगेचच आपल्या बाळाला वाचवण्यासाठी सापाशी लढू लागते. सापावर प्रतिहल्ला करत ती आपल्या मुलाला त्याच्या तावडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. सापही यात मागे राहत नाही आणि आपला फणा पसरत तो खारीवर हल्ला करतो पण तिच्यातली आई तोपर्यंत जागी झालेली असती जी कोणत्याही परीस्थितीत आपल्या मुलाला एकटं सोडण्यासाठी तयार नसते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या मुलाल सापाच्या तावडीतून सोडवून ती तिकडून पळून जाते. व्हिडिओतील ही दृश्ये आपल्या प्रेमाचे सार्थ उदाहरण दाखवते.
Mother Squirrel never gave up on her baby. 💓💓 pic.twitter.com/OFp5au5qvN — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 27, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटत नाही की बाकीच्या खारींना तिच्या कथेवर आणि तिने सापाला कसे हरवले यावर विश्वास बसेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हा रॅट स्नेक आहे, तो विषारी नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती खरी योद्धा होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.