Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या कचरा डेपोत झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या आघातातून संपूर्ण शहर सावरत असतानाच, या दुर्घटनेशी संबंधित एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 06:30 PM
सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी...; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी...; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या कचरा डेपोत झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या आघातातून संपूर्ण शहर सावरत असतानाच, या दुर्घटनेशी संबंधित एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या नागेश गायकवाड यांच्या २३ वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला पतीच्या अकाली निधनाच्या विरहातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मानले जात होते. मात्र, शासनाकडून मिळालेल्या २० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या कौटुंबिक आणि मानसिक छळाला कंटाळूनच सोनाली यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

माहेरच्यांचा आक्रमक पवित्रा; पोलीस ठाण्यात धाव

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, सोनाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत, जोपर्यंत सासरच्या दोषी मंडळींवर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन (PM) करू देणार नाही, असा इशारा दिला. सोनाली यांचे आई-वडील आणि नातेवाइकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले आहे.

‘पैशांच्या हव्यासापोटी घेतला बळी’ — नातेवाईकांचा आरोप

सोनाली यांच्या आई मीरा वक्ते आणि वडील लोभाजी वक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती नागेश यांच्या मृत्यूनंतर शासनाकडून मिळालेल्या २० लाख रुपयांच्या मदतीची रक्कम बळकावण्यासाठी सासरची मंडळी सोनाली यांच्यावर सातत्याने दबाव आणत होती. लहान वयात पती गमावल्याचे दुःख उराशी बाळगून असलेल्या सोनाली यांचा पैशांच्या वादातून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास लावून घेतला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा : चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर ‘या’ तारखेला प्रत्यक्ष बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत घेणार आढावा

दोन चिमुकल्या मुली पूर्णपणे अनाथ

८ जुलैच्या दुर्घटनेत आधी वडिलांचे आणि आता अवघ्या काही आठवड्यांतच आईचेही छत्र हरपल्यामुळे गायकवाड दाम्पत्याच्या दोन निष्पाप चिमुकल्या मुली पूर्णपणे अनाथ झाल्या आहेत. एकाच कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी दुःखाच्या डोंगरामुळे आणि घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत असून, माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Sonali gaikwad has committed suicide by hanging herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Sucide News

संबंधित बातम्या

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
1

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
2

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
4

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.